वाशीम : रिसोड विधानसभा निवडणूक निरीक्षक मा. कृष्णप्रसाद अधिकारी यांचे राजकीय पक्षांना मार्गदर्शन

 

 

 

वाशीम

 

 

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील

 

 

 

वाशीम : आज दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता ‘रिसोड विधानसभा’ ३३- मध्ये रिसोड तहसील कार्यालयात निवडणूक निरीक्षक कृष्णप्रसाद पती यांचे आगमन झाले त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर राजकीय पक्षांना आचारसंहिते बाबत आपण सामोपचाराने निवडणुका लढवाव्यात, याबाबत आपण कोणत्याही गोष्टीची अफवा पसरली असल्यास त्याचे निराकरण करावे. केवळ अफवा पसरवल्याने त्याचे परिणाम वाईट होतात. आपण सर्व एकच मतदारसंघातले नागरिक आहात त्यामुळे निवडणूक ही थोड्या दिवसाची असते मात्र संबंध जीवा-भावाचे कायम ठेवावेत.

 

 

 

झालेला खर्च नियमाप्रमाणे तहसील कार्यालयात द्यावा. निवडणुकी संदर्भात आपल्याला रिसोड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांनी निवडणुकी संदर्भात माहिती दिलेलीच असेल परंतु तरीपण आपण आपल्या सहकाऱ्यांना या आचारसंहितेबाबत माहिती देऊन ही निवडणूक आचारसंहिता पाळावी व कोठेही वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी तरी पण काही तक्रारी असल्यास माझ्या फोनवर तक्रारी मांडू शकता असे बोलतांना निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णप्रसाद पती यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले यावेळी रिसोड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांचे अध्यक्षतेखाली व यांच्या सहकारी प्रतीक्षा तेजनकर तहसीलदार आणि पुंड तहसीलदार मालेगाव आणि रिसोड नगरपरिषद चे मुख्याधिकारी शेवदा हेही यावेळी उपस्थित होते. तर राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित राहिले.