वाशिम : अखेर सावरगाव बर्डेच्या गाव तलावातुन इसमाचा मृतदेह आपत्कालीन पथकाने शोधून काढला

 

 

 

वाशिम

 

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील

 

 

 

वाशिम : पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक शाखा मंगरूळपीरच्या जवानांनी मोठ्या अथक प्रयत्नानंतर आज अखेर २० फुट खोल पाण्यातील गाव तलावात तळाशी असलेला मृतदेह शोधून वर आणला वाशिम तालुक्यातील ‘सावरगाव बर्डे’ नजिकच्या तलावात नविन आरटीओ ऑफीसचे बांधकाम चालु असलेल्यां येथील कामावर असलेला श्रवन ईश्वर जांम्भोले अंदाजे वय (४२) वर्ष रा.नवखला ता. नागभीड जि.चंद्रपूर हे बांधकाम चालु असलेल्या शेजारीच आज २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी शेजारील सावरगाव बर्डे गाव तलावात बुडाल्यी माहीती मिळताच वाशिम तहसीलदार निलेश पळसकर सर यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन चे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले.

 

 

 

तेव्हा पथकाचे अतुल उमाळे,गोपाल गीरे,लखन खोडे,प्रदीप आडे यांना शोध व बचाव साहित्यासह घटनास्थळावर रवाना केले तहसीलदार निलेश पळसकर सर यांच्या आदेशानुसार एएसआय संजय गोडसे साहेब यांच्या नेतृत्वात ऑपरेशन चालु केले असता शेवटी तलावात अथक प्रयत्नांनंतर आज २२ ऑक्टोंबर रोजी दुपारी अंदाजे १२ ते १ वाजताच्या सुमारास २० फुट खोल पाण्यातील खाली तळाशी असलेला मृतदेह शोधून वर बाहेर आनुन पोलीसांच्या ताब्यात दिला. यावेळी वाशिम तहसीलदार निलेश पळसकर सर,जि.आ.व्य. अ.शाहु भगत साहेब हे वरचेवर संपर्क साधुन होते. घटनास्थळावर पोलीस ठाणे वाशिम ग्रामीण चे एएसआय संजय गोडसे साहेब,पो.काॅ.शरद कुंभरे साहेब,तसेच वाशिम परीवहन विभागाचे आयएमव्ही अधिकारी पल्लेवाड साहेब आणी कामगार नागरिक नातेवाईक हजर होते.अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.