वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील
washim : वाशिम शहरातील ग्रामीण विकास यंत्रणेच्या भिंतीवरच ‘राजकीय पक्षाचे’ अजून झळकत आहेत. या बाबीची आचारसंहितेची कुठे जोड लागते का ? ,की नाही याबाबत याबाबत थोडी जनतेला सांशकता आहे. सध्या स्थितीत विधानसभा निवडणूक vidhansabhaa election आचारसंहिता चालू झाली असून जिल्हाभरातील सर्व नगरपालिका, पालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत व खाजगी मालमत्तेवरची सर्व बॅनर राजकीय पक्षाचे काढले जातात. मात्र वाशिम शहरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयाच्या भिंतीवर राजकीय पक्षाचे बॅनर झळकत आहेत. अद्यापही हे काढले नसल्याचे दिसते.
त्यामुळे निवडणूक अधिकारी हे राजकीय पक्षाचे दास तर नाही ना ?, अशी शंका सामान्य नागरिकांना पडत आहे. जर दास नाही झाले तर अधिकाऱ्यांचे या बाबीकडे लक्ष कसे नाही. हा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता आहे .त्यामुळे आचारसंहिता लागून तीन दिवस लोटले पण अद्याप बॅनर हटवल्या न गेल्याने अधिकारी कुठे दंग आहेत, की शासनाचा निवडणूक आयोग दास झाला. हे मात्र सध्या स्थितीत गुलदस्तात आहे. या बाबीची दखल निवडणूक निर्णय अधिकारी येथील का ? हा प्रश्न सध्या स्थिती अनुत्तरीत आहे