washim : भारत गुंजकर यांच्या उपोषणाला यश येतांना दिसतंय

 

washim

 

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील

 

 

 

washim : रिसोड risod  शहरातील रहिवासी भारत जगन्नाथ गुंजकर (वडार समाज संपर्कप्रमुख, वाशिम जिल्हा) यांनी रिसोड नगर परिषदेसमोर उपोषण केले होते. त्याबाबत रिसोड मुख्याधिकारी यांनी याबाबत दखल घेऊन समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यावेळी दिले होते व तसे निवेदन जिल्हाधिकारी यांना सुद्धा दिले होते. त्याचाच भाग व संदर्भ देऊन भारत जगन्नाथ गुंजकर यांनी वाशिम जिल्हाधिकारी यांच्या पत्राचा संदर्भ … कक्ष ४ म.स.(महसुल)का.वी ६४३ /२०२४ दि.५/९/२०२४ चे पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद रिसोड यांना प्राप्त झाले. त्यानुसार सर्वे नंबर ४४१ मधील रहिवाशांची जागा नियमाकुल करण्यासाठी उपविभागीय भूमी अभिलेख अधिकारी रिसोड, कडे आपण अहवाल पाठवावा ही विनंती भारत जगन्नाथ गुंजकर यांनी रिसोड ‘नगर परिषदेचे’ मुख्याधिकारी यांना विनंती अर्जाद्वारे दि.१५/१०/२०२४रोजी केली आहे. व त्याचीच एक प्रत उपभागीय भूमी अभिलेख अधिकारी रिसोड यांना दिली आहे.