वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील
वाशीम : वाशिम washim शहरात डी बी पथकाने धडक कारवाई करत विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनासह देशी दारूचे चाळीस बॉक्स जप्त केले आहेत. हा एकूण मुद्देमाल २,६५०००/-रु.चा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की वाशिम शहर पोलिसांना सूत्राकडून माहिती प्राप्त झाली की अकोला नाका ते पुसद नाका या रोडने एका लाल रंगाच्या व्हॅनमध्ये देशी दारूचे बॉक्स घेऊन जाणार आहे. यासाठी वाशिम पोलीस स्टेशनच्या वाशिम शहर येथील डी बी पथकाने पोस्ट ऑफिस चौकात मंगळवार दिनांक १५ चे रात्री नाकाबंदी केली दरम्यान लाल रंगाची व्हॅन येत असल्याचे दिसून आल्याने सदरची व्हॅन थांबवून वाहनांची पाहणी केली.
त्यामध्ये देशी दारूचे बॉक्स आढळून आले यावेळी वाहन चालकास त्याबाबत माहिती विचारली असता त्याचे नाव पंकज शिंदे pankaj shinde राहणार शुक्रवार पेठ येथील राहणारा असल्याचे सांगितले यावेळी त्याच्याकडे असणाऱ्या दारूच्या परिवारांना बद्दल विचारले असता त्याकडे कोणताही पुरावा आढळून आला नाही. वाशिम बस स्टँड जवळील जवळील देशी दारूचे दुकानांमधून घेऊन अनसींग भागात विक्री करता घेऊन जात असल्याचे सांगितले यावेळी पोलिसांनी एक लाल रंगाची व्हॅन क्रमांक एम एच २७ डी १३०९ व त्यामधील देशी दारूचे चाळीस बॉक्स असा एकूण एवच दोन लाख 65 हजार रुपयांचा म** जप्त करून वाहनचालक व देशी दारू दुकान चे चालकावर पोलीस स्टेशन वाशीम शहरात येथे नियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
देशी दारूचे दुकानाचे चालकावर कारवाई करण्याकरता संबंधित विभागास पत्र व्यवहार करण्यात येत आहे सदरची कॅफे चेकिंग विशेष मोहीम ही जिल्हा पोलीस अधीक्षक अनुसतारे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड आणि उपविगीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांचे मार्गदर्शनात कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंह ठाकुर पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव ए एस आय कैलास कोकाटे पोलीस हेडकॉन्स्टेबल लाल मनी श्रीवास्तव, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत वाढनकर पोलीस कॉन्स्टेबल शैलेंद्र सिंह ठाकुर पोलीस कॉन्स्टेबल निलेश देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल महादेव भिमटे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप दुतोंडे, पोलीस कॉन्स्टेबल कोरडे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.