वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
washim : वाशिम जिल्ह्यातील राज्य मार्ग क्रमांक ५१ ते(नागठाणा) ते जुमडा (सीमेपर्यंत) पर्यंत झालेला मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गतचा डांबरीकरण झालेला रस्ता थोड्याच अवधीत खराब झाला असून याबाबत अनेक निवेदन दिली, आंदोलने झाली. त्याबाबत काही प्रमाणात मुरूम टाकून दुरुस्ती केल्याचा बनाव सुद्धा संबंधित ठेकेदार व अभियंता यांनी केला. आणी त्याची नामधारी डागडुजी सुद्धा केली, परंतु पाहिजे तसा रस्ता तयार झाला नसून याबाबतची अनेक निवेदने दिली असल्याचे शेतकरी पुत्र राम इढोळे यांनी बोलतांना सांगितले.
रस्ता खराब होण्यासाठी संबंधित ठेकेदार मालपाणी व अभियंता जबाबदार आहेत तरी ठेकेदार मालपाणीचे लायसन रद्द करण्यात यावे व या रस्त्यावर लक्ष देणारे अभियंता यांच्यावर सुद्धा कार्यवाही करण्यात यावी. जर संबंधित कार्यकारी अभियंत्याने कार्यवाही केली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा अडोळी येथील शेतकरी पुत्र राम इढोळे ram idole यांनी बोलतांना केला. व या सर्व बाबीस संबंधित विभागाचे अधिकारी व जिल्हा प्रशासन जबाबदार राहतील असेल असे या रस्त्यावर बसून बोलताना सांगितले.