वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील
washim : रिसोड-मालेगाव risod-malegaon विधानसभा मतदारसंघात रिसोड तालुक्यात अचानक नमुना नंबर सहा मध्ये एका-एका दिवशी खूप मतदार नोंदणी झाली आहे. आतापर्यंत अशा अचानक नोंदी झाल्या नाहीत. त्यामुळे संशयाला जागा उरते. याबाबत रिसोड risod तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी रिसोड- मालेगाव risod-malegaon विधानसभा यांना दिनांक २/ १०/२०२४ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे संशय व्यक्त केल्याने याबाबतची चौकशी करण्यात यावी. जर ह्या मतदार नोंदी तारखेच्या आत झाल्या व योग्य रीतीने झाल्यास ग्राह्य धरण्यात याव्यात.
अन्यथा ग्राह्य धरू नये व यामध्ये असा चुकीचा प्रकार घडला असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी.आणी गुन्हे दाखल करावे, यासाठी रिसोडचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामेश्वर गणपतराव देवकर व त्यांचे सहकारी तालुका उपाध्यक्ष नामदेव बोरुडे, विलास मोरे ,रवी कांबळे, शंकर आरगडे, प्रकाश चिपडे, पांडुरंग वाळके, अमोल भाऊ नरवाडे, गोपाल जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.