washim : अडोळी सर्कल तथा महसूल मंडळामध्ये ओल्या दुष्काळाचे सावट

 

washim

 

वाशीम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील

 

washim : वाशिम तालुक्यातील केकतऊमरा kekatumara महसुली मंडळासह तालुक्यातील संततधार ‘अतिवृष्टीमुळे’ सोयाबीन व इतर पिकाचे अतोनात नुकसान झालेल्या, अशा संपूर्ण शेतामध्ये या पावसामुळे पाणी साचले असून शेतकऱ्यांना आपली सोयाबीन सोंगता येईना जी सोयाबीन सोंगली त्या सोयाबीनच्या शेंगा गळून पडत आहेत. दररोजच्या पावसाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी इतरत्र व अन्य मार्गाची कोणतीही वाईट निवड करू नये कारण अशी संकटे येतच असतात त्यामुळे शासनाने व प्रशासनाने वाशिम washimतालुक्यातील केकतउमरा kekatumara  महसुली मंडळातील व इतर काही महसूल मंडळे अतिवृष्टीतून वगळल्या गेली त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास दूर जातांना दिसतो. असे शेतकऱ्याला सध्या स्थितीत तरी वाटत आहे.

 

 

 

तसेच जुमडा jumda येथील शेतकरी नामदेवराव उद्धव शिंदे यांच्या शेतात सतत सात दिवस परिसरात पाऊस पडल्यामुळे शेतात पाणी साचल्याने शेतकरी चिंताचूर झाले दरम्यान वाशिम washim तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसीचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे amol shinde यांनी त्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला व याबाबत जर शासनाने वगळलेल्या महसूल मंडळाचा नुकसान झालेल्या सर्वच मंडळाचा पंचनाम्यासाठी सर्वे मध्ये समाविष्ट केले नाही तर वाशिम जिल्ह्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष चक्रधरजी गोटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे तरी शासनाने व प्रशासनाने केकतऊमरा महसूल मंडळा सह राहिलेल्या मंडळाचा समावेश करावा अशी अपेक्षा अमोल शिंदे व शेतकरी नामदेवराव शिंदे, शिवाजी शिंदे तुळशीराम शिंदे सचिन शिंदे, रामकिसन पडघान यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.