किशन काळे / प्रतिनिधी
पोलिसांना चकमा देऊन दोन आरोपी फरार वाशिम मालेगाव येथील सुवर्ण सराफा व्यवसायावर हल्ला प्रकरणी सराफा कारगिरावर हल्ला झाला होता त्यांच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता दिनेश किशन निरापुरे आरोपी हा वाशिमच्या कारागृहामध्ये बंदी होता त्यांच्यासह अन्य प्रकरणातील यश पवार अशा दोन आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस बंदोबस्तात 12 ऑगस्ट रोजी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेले असता संधीचा फायदा घेत दोन आरोपी पोलिसांना चकमा देऊन हॉस्पिटल मधून 12 ऑगस्ट रोजी फरार झाले.
या घटनेचा सात दिवस उलटूनही पोलिसांना थां ग पत्ता लागत नाही मालेगाव पोलीस स्टेशन मध्ये 22 डिसेंबर रोजी हत्याकांड आणि दरोडा गुन्हा नोंद झाला होता तपास दरम्यान पाच आरोपी गुन्हा दाखल झाले होते दिनेश किशन मीरापुरे राहणार आमदाबाद गुजरात यांना मालेगाव पोलिसांनी अटक केली होती वाशिम येथील न्यायालयामध्ये अंडर ड्रा एल केस चालू होती सदर फिर्यादी साक्षीदार यांचे बयान झाले होते काहीचे बयान बाकी आहे.
किशन मीरापुरे वय वर्ष 45 राहणार आमदाबाद यश पवार वय वर्ष 30 असे दोन आरोपी आजारी होते दोन्ही आरोपींना वाशीम कारागृह मधून येथून मेडिकल हॉस्पिटलला 12 ऑगस्ट रोजी नागपूरला नेले असता तेथून दोन्ही आरोपी पोलिसांना चकमा देऊन फरार झाले ही घटना घटल्यानंतर सुरुवातीला गोपी नीता कमालीची बाळगण्यात आली दरम्यान या घटनेचे बिंग फुटल्यावर पोलीस वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली दोन्ही आरोपींना शोध घेणारी पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत.
तरी या घटनेत सात दिवस झाले तरी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही एका गंभीर गुन्ह्यातील प्रकरणातील आरोपी गरजेचे ठिकाण पाहून हॉस्पिटल मधून पळून जाऊन ही गंभीर्य बाब मानली जात आहे नेमकी या प्रकरणातील नेमकी कोणावर कारवाई होणार हळद आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम युद्ध पातळीवर चालू आहे याकडे लक्ष लागून आहे. किशन काळे प्रतिनिधी