Washim : शिवशंभू गणेश उत्सव मंडळ अरक व खासदार वैद्यकीय कक्ष वाशिम जिल्ह्याचे वतीने अरक येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न.

 

वाशीम जिल्हा प्रतिनिधी/ नारायणराव आरु पाटील 

 

Washim : शिवशंभू गणेश उत्सव मंडळ अरक व खासदार वैद्यकीय कक्ष वाशिम जिल्ह्याचे वतीने अरक येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न.नवनियुक्त खासदार श्री संजय देशमुख यांच्या मान्यतेने नव्याने सुरू झालेल्या खासदार वैद्यकीय कक्षाचा माध्यमातून शिवशंभू गणेशउत्सव मंडळ अरक यांचा वतीने नेत्ररोग तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर अरक येथे आयोजन केले होते प्रसंगी ७५ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला, मोतीबिंदू चे ऑपरेशन निघालेल्या २२ रुग्णाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे,सदर शिबिराला खासदार संजयभाऊ देशमुख यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या सदर शिबिरात नेत्ररोग तज्ञ डॉ अश्विनी गव्हाणे मॅडम यांनी तपासणी केली ,

 

 

या शिबिर आयोजन करण्यासाठी अजय बुरे, गणेश गावंडे,दिलीप गुरुजी , विजू बुरे,माणिक बुरे, गजानन पांडेब्वा,हरिओम बुरे,राम बुरे,ऋषी बुरे, सागर महल्ले,राम निकम, लक्ष्मण निकम, पंढरी निकम,शिवा ज निकम, बंडु बुरे मा सरपंच, अविनाश बुरे, संतोष गावंडे , गजानन पाटील, रामभाऊ बुरे, किशोर ब बुरे, संतोष बुरे सरपंच,राम ब बुरे समस्त गावकरी मंडळी अरक व शिवशंभू गणेशउत्सव मंडळाचे सहकार्य लाभले, त्यासह खासदार वैद्यकीय कक्षप्रमुख शिवा सावके यांचासह तालुकाप्रमुख रामदास पाटील सुर्वे, डॉ.सुनिल राऊत, प्रज्वल येवले यांचे विशेष सहकार्य लाभले.