
mansoon update : उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे . अनेकांना उष्माघाताला सामोरे जावे लागत आहे. असे असताना चे हवामान विभागाने मान्सूनची बद्दलची आनंदवार्ता दिली आहे. महाराष्ट्रात लवकरच मान्सून येणार असून, तळ कोकणात म्हणजे रत्नागिरीत तो ४ जूनपर्यंत येण्याचा अंदाज वर्तविला आहे.यंदा देशामध्ये १०६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज देण्यात आला आहे. सध्या विदर्भ, मराठवाड्यात सूर्य चांगलाच तळपत आहे.
त्या ठिकाणी अक्षरशः आग ओकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नागरिक उष्णतेने त्रस्त आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळणार आहे.’रेमल’ या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावरील मान्सून mansoon update सक्रिय झालेला आहे. त्यामुळे मान्सूनला कुठेही अडथळा येणार नाही. केरळच्या पुढील वाटचाल चांगल्यारीतीने होणार आहे.मान्सूनने यावर्षी अकरा दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारलेली आहे.
मान्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा रविवारपासून अधिक बळकट होतील परिणामी मान्सूनचा वेग चांगला राहील. असा अंदाज देण्यात आला आहे.
मराठवाड्यात पावसाचा अंदाज.|mansoon update
मध्य महाराष्ट्र दोन ते पाच जून पर्यंत महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. मराठवाड्यात दोन ते पाच जून नांदेड, धाराशिव, लातूर
तर तीन ते चार जून बीड ,जालना व इतर शेजारील जिल्हे वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकड्यात त्यात पाऊस पडेल.