Washim : लोणी बुद्रुक शेत शिवारामध्ये कुऱ्हाडीने वार करून महिलेची हत्या.

 

 

प्रतिनिधी /किशन काळे

 

लोणी बुद्रुक शेत शिवारामध्ये कुऱ्हाडीने वार करून महिलेची हत्या. वाशिम (washim) जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक (Loni budruk) गावामध्ये रहिवासी असलेला दशरथ निवृत्ती पारवे वय अंदाजे ६० वर्षे यांच्या मालकीची लोणी बुद्रुक येथे शेत शिवारामध्ये गट नंबर २०२ गट नंबर एक मध्ये एक हेक्टर २२ आर एवढी जमीन असून दशरथ पारवे वय वर्ष 60 आणि त्याच्या पत्नी कमल दशरथ पारवे वय वर्ष 55 वर्ष, हे शेतामध्ये सोयाबीन कापणीनंतर मळणी यंत्रातून काढून लवकर झाली होती सायंकाळच्या सुमारास ते आपले काम आटोपून सोयाबीनचे पोते शिवत होते त्यांच्या शेतामध्ये वास्तव्यात असताना एक आक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान या दोघा दापत्यावर अज्ञात व्यक्तीने प्राण घातक हल्ला केल्याची घटना घडली‌आहे.

 

 

 

सदर घटनेत दशरथ पारवे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने  झाली असून दशरथ पारवेच्या पत्नी कमल दशरथ पालवे या जागेवरच ठार झाल्या.काही वेळाने दशरथ पारवे यांच्या  शेतातील शेजारी असलेले जेवण झाल्यानंतर त्यांच्या भेटीला आले त्यांना दशरथ पारवे व त्यांच्या पत्नी कमल पारवे ह्या रक्ताच्या थारोळ्यात व जखमी अवस्थेत दिसले त्यानी त्यांना पुढील उपचारासाठी रिसोड ग्रामीण रुग्णांमध्ये पाठविण्यात आले.त्यानंतर रिसोड पोलीस स्टेशनला माहिती दिली असता पोलीस उपनिरीक्षक अशोक गीते त्यांची सर्व कर्मचारी टीम घटनास्थळी दाखल झाली दर घटनेचा पंचनामा करून मूर्त महिलेचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रिसोड येथे रिसोड येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले.

 

 

 

दशरथ पारवे यांनी फिर्याद दिली की पत्नी नामे कमल पारवे यांच्या डोक्यात यशवंता निवृत्ती पारवे वय वर्ष ५५ वर्षं,पंडित यशवंत पारवे वय २९ वर्ष, आदिनाथ उर्फ सखाराम यशवंत पारवे वय २१ वर्षे आदिनाथ उर्फ सकाराम यशवंता पारवे वय २१ वर्षे सर्व राहणार लोणी बुद्रुक यांनी कुऱ्हाडीने वार करून तिचा खून करण्यात आला. फिर्यादीवरून यशवंता निवृत्ती पारवे वय वर्ष ५५ वर्षं,पंडित यशवंत पारवे वय २९ वर्ष, आदिनाथ उर्फ सखाराम यशवंत पारवे वय २१ वर्षे आदिनाथ उर्फ सकाराम यशवंता पारवे वय २१ वर्षे सर्व राहणार लोणी बुद्रुक यांच्याविरुद्ध कलम 103(1) 109• 54 •35(5) भारतीय न्याय संहिता नुसार 2023 अन्य ये त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत.