वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव पाटील
वाशिम (Washim ) जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल येथे ग्रामपंचायत विरोधात ग्रामपंचायत अधिकारी यांना त्वरित निलंबित करण्यात यावे. ओबीसी वाल्यांना घरकुल टाळून ओपन वाल्यांना घरकुल दोन -दोन देण्यात आले आणि ते ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल या गावी ८आक्टो.पासून प्रकाश लक्ष्मण डोंगरे हे उपोषणाला बसलेले आहेत या गावी भ्रष्टाचाराची लिमिट न राहता ग्रामपंचायत अधिकारी सुद्धा यामध्ये भ्रष्टाचार करत आहेत पाणीपुरवठा योजनेवर जो कर्मचारी भरला तो कुठल्या आमसभेतून न भरता त्याला परस्पर निवड केली आहे.
असे उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे. ओबीसी वाल्यांना घरकुल न देता ओपन वाल्यांना दोन दोन घरकुल देण्यात आले आणि विशेष म्हणजे ते ग्रामपंचायत सदस्य असून त्यांना दोन दोन घरकुल दिले. ग्रामपंचायतनचा मनमानी कारभार चालू आहे. असे म्हणणे उपोषणकर्त्याचे आहे.आमचे कोण काय करते ? ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच हे सुद्धा अरेरावीची भाषा उपोषणकर्त्याशी बोलत आहेत जर तू असे केले तर आम्ही तुला कुठे नेऊन घालू हे सुद्धा तुला कळणार नाही !आम्ही जे करू हेच खरं आहे ग्रामपंचायत आमची आहे ,आम्ही काही करू, आमचं मालक कोणीच नाही.
तुमच्याकडून काय होते ते करुन घे !अशी भाषा बोलणारी ग्रामपंचायत आतापर्यंत कधीच पाहिली नाही आणि आतापर्यंत जे झाले उपोषण हे ग्रामपंचायत समोर भविष्यात कधी झालं नाही. आणि होणार सुद्धा नाही अशी परिस्थिती या लिंगा कोतवाल गावाची आहे त्वरित कार्यवाही करावी अशी उपोषण कर्त्याची मागणी ऐकून घेऊन त्वरित सदस्य आणि सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना त्वरित निलंबित करून भ्रष्टाचारी ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत घरगुती झाल्याची लोकांचा संभ्रम झालेला आहे अशी उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी.