नारायणराव आरु पाटील, वाशिम/ प्रतिनिधी
श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिठद येथे आज वाशिम (washim) ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार श्रीदेवी पाटील मॅडम यांनी भेट दिली. काल सोमवार ला विद्यार्थ्यीनींना बस मध्ये बसविण्यासाठी शिक्षक आले असता काही टवाळखोर मुले अभद्र चाळे करताना दिसले .सरांनी त्यांना टोकले असता मुलांनी श्री मारुती भिसडे सर यांना शिवीगाळ व मारहाण केली होती. त्याची चौकशी करण्याकरता व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता ठाणेदार श्रीदेवी पाटील मॅडम आज रिठद देते उपस्थित होत्या.महिला व मुलींचे संरक्षण करणे हेच आमचे ध्येय असे त्यां म्हणाल्या.
कालच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी टवाळखोर मुलांना चांगला चोप देण्यात यावा असे गावकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले की ज्यामुळे मुलींची सुरक्षा अबाधित राहिल. यावेळी त्यांनी शाळेतील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन केले. सेल्फ डिफेन्स बद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची सुरक्षा हेच आपले ध्येय असे त्यांनी सांगितले.
तसेच आजच्या या विद्यार्थी मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजयराव घुगे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य मार्गदर्शक म्हणून श्रीदेवी पाटील मॅडम ठाणेदार यांनी आपले मत मांडले तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महिला व मुलींचे संरक्षण करणे हेच आमचे ध्येय असे त्यां म्हणाल्या.अभ्यासाबरोबरच आत्म सुरक्षा याबद्दल विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपले आई-वडील वगळता इतर कोणत्याही व्यक्तीने आपल्याला केलेला स्पर्श हा कोणत्या स्वरूपाचा आहे हे विद्यार्थ्यांना ओळखता आले पाहिजे असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले.
तसेच जर काही टारगट किंवा टवाळखोर मुले जर आपल्याला वारंवार त्रास देत असतील तर त्यांनी स्वतःचा फोन नंबर ही विद्यार्थ्यांना दिला, तसेच पोलीस हेल्पलाईन नंबर सुद्धा विद्यार्थ्यांना सांगितला. ज्याद्वारे विद्यार्थी सरळ पोलिसांकडे कंप्लेंट करू शकतो. श्रीदेवी पाटील मॅडम यांच्यासोबत पीएसआय श्री चेके साहेब हे सुद्धा आले होते. सोबत निर्भया पथकाच्या सदस्यही उपस्थित होते. यांचा नंबर सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.तंटामुक्ती अध्यक्ष श्री भीमराव बोरकर साहेब यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
तसेच संचालक श्री भगवानराव बोरकर साहेब, सेवानिवृत्त शिक्षक श्री गजानन आरु , पालक गजानन जाधव हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य श्री संजय राव घुगे यांनी श्रीदेवी पाटील मॅडम यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच शिक्षण विभागातर्फे श्री हनुमानजी बोरकर सर केंद्र प्रमुख यांनी ठाणेदार श्री पाटील मॅडम यांचे स्वागत केले .तसेच ठाणेदार श्रीदेवी पाटील मॅडम यांनी श्री मारुती भिसडे सर यांनी विद्यार्थ्यांच्या संरक्षणाकरता कोणतीही तमा न बाळगता पोलिसापर्यंत पोहोचण्याचे धाडस दाखविले याबद्दल त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .
तसेच शाळेने विद्यार्थ्यीनींच्या सुरक्षे साठी केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षे करता शासन तसेच पोलीस सर्वतोपरी मदत करतील, कोणाची गय केली जाणार नाही. गुन्हेगारांना शिक्षा होईलच असे पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. आत्म संरक्षणा साठी त्यांनी विद्यार्थ्यांना धडे दिले.यावेळी पर्यवेक्षक श्री आर बी भिसडे सर, प्राध्यापक,शिक्षक व हजारो विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी जेष्ठ पत्रकार श्री नारायणराव आरु यांनी आपले मत व्यक्त केले तसेच