शिक्षक सहकारी संस्थेत आमसभेनिमित्त शिक्षकांचा सेवापुर्तीचा सपत्नीक सत्कार.

 

 

नारायणराव आरु/प्रतिनिधी 

 

वाशीम येथे..वाशिम जिल्ह्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेमध्ये मा.नामदार प्रतापरावजी जाधव केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण मंत्री भारत सरकार व वाशिम- यवतमाळचे खासदार संजयभाऊ देशमुख, आमदार अमितभाऊ झनक रिसोड मालेगाव मतदारसंघ, आमदार किरणराव सरनाईक विधान परिषद सदस्य, विष्णुपंत भुतेकर संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना, या मान्यवरांनी रिठद येथील रहिवासी विजय तुळशीराम बोरकर यांनी ऐच्छिक पेन्शन घेऊन आपली सेवापूर्ती पूर्ण केली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक विजय बोरकर यांचा सपत्नीक मान्यवरांनी सत्कार केला.