पत्रकारीतेमध्ये ऊल्लेखनिय कार्य करणार्‍या युवा पञकार फुलचंद भगत यांना ‘भारतीय रत्न’ आणी ग्लोबल प्रेष्टीजीअस पुरस्कार जाहीर.

 

 

किशन काळे, रिसोड/प्रतिनिधी 

 

पत्रकारीतेमध्ये जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्टामध्ये वेगळा ठसा ऊमटवणारे,आपल्या लेखणीतुन जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडुन न्याय मिळवुन देणारे युवा पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना पञकारीतेमधल्या ऊत्कृष्ट कार्याबद्दल वर्थी वेलनेस फाउंडेशन लखनऊ व्दारा ‘भारतीय रत्न’ पुरष्कार आणी ग्लोबल प्रेष्टीजीअस अवार्ड जाहीर पुणे येथील फाऊंडेशन व्दारा जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

 

समाजपयोगी व जनसामान्यांना अग्रस्थानी ठेवून आपल्या लेखणीच्या माध्यमातुन सर्वसामान्यांचे विविध प्रश्न,समस्या शासनदरबारी पोहचुन न्याय मिळवून देणारे,परिसरात घडणार्‍या घटना घडामोडीचे जलद वार्तांकन करणारे युवा पञकार तथा सामाजीक कार्यातुन वेगळा ठसा ऊमटवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळख असणारे फुलचंद भगत यांना यंदाचा ऊत्कृष्ट आणी पञकारीतेमधील अतुलनिय कार्याचा गौरव म्हणून लखनऊ येथील वर्थी वेलनेस फाऊंडेशनचा ‘भारतीय रत्न’ पुरस्कार यासोबतच पुणे येथील ग्लोबल प्रेष्टीजीअस अवार्ड जाहीर झाला आहे.

 

 

 

एका सोहळ्यामध्ये सदर पुरस्कार मिळणार आहेत.फुलचंद भगत यांना याआधीही पञकारीता आणी सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.गोरगरीब लोकांच्या हितासाठी सतत आपली लेखणी झिजवुन जनसामान्यांना भेडसावणार्‍या विविध समस्यांना वाचा फोडुन त्यांना तत्परतेने न्याय देण्यासाठी नेहमी झटत असणार्‍या भगत यांना पञकारितेमधिल पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातुन कौतुक आणी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 

 

शासन प्रशासन तसेच जनता यामधील दुवा बनुन व विविध शासकिय योजना गरजु व पाञ लाभार्थ्यापर्यत पोहचवण्यासाठी मदत करणे,शेतकरी,कष्टकरी,विद्यार्थी आदी घटकांना न्याय मिळवुन देण्यात भगत यांचा नेहमी पुढाकार घेत असतात.महिला सक्षमीकरणासाठी,लोकहित जोपासत विविध सामाजिक प्रश्नावर आपल्या लेखणीव्दारे प्रकाश टाकुन न्याय मिळवुन देण्याची भुमिका पञकार पुलचंद भगत यांची असल्याने

 

 

 

त्यांना हे मिळालेले पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचा अनेकांनी कौतुक करत ठिकठिकाणी अभिनंदनपर सत्कारही करण्यात आला आहे.सामाजीक कार्यासाठी माझी सदैव लेखणी झिजत राहिल अशा भावना या सत्कारप्रसंगी पञकार फुलचंद भगत यांनी व्यक्त केल्या आहेत.