चिंचाबापेन ते हिवरापेन या रस्त्यावरील वाढलेल्या झाडे देत आहेत अपघातास निमंत्रण, झाडांची छाटणी करणे आवश्यक.

 

नारायणराव आरु पाटील,वाशिम/प्रतिनिधी

 

केशवनगर ते बेलखेडा या रस्त्यामधील चिंचाबापेन ते हिवरापेन या रस्त्यालगत वाढलेल्या काटेरी झाडाची संख्या जास्त झाली असून त्या काटेरी झाडाच्या फांद्या डांबरी रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे डोळ्याला किंवा शरीराला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत या रस्त्याने एस.टी.ची ये-जा असते खिडकी शेजारी बसलेल्या शेजाऱ्यांच्या डोळ्याला काटेरी झुडपामुळे इजा होऊन डोळा सुद्धा जाऊ शकतो व कायमचे अंधत्व येऊ शकते या बाबीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड यांनी दखल घेऊन या रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपाची साफसफाई करणे गरजेचे आहे.

 

 

 

याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे वतीने रिसोड तालुका प्रमुख नारायण आरु यांनी निवेदन सुद्धा दिले परंतु त्याची अद्याप पर्यंत दाखल घेतली नसल्याचे यावरून लक्षात येते. या रस्त्याला सुद्धा या रस्त्याला पांदन रस्त्याचे स्वरूप येऊ नये अशीच या रस्त्यावरील प्रवाशांना भीती वाटते. आणि रस्त्याची सुद्धा दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येते.