नारायणराव आरू पाटील, वाशिम/प्रतिनिधी
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नेहमीप्रमाणे जो गुरांचा बाजार भरतो तो बाजारात कृषी उत्पन्न बाजार समितीचा मानस असावा असं शेतकऱ्यांना वाटत असतांनाच शेतकऱ्यांनी वाशिम जिल्हा उपनिबंधक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.जर बाजार स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला तर बाजार समितीच्या समोरील रस्त्यावर गुरांचा बाजार भरवू, याबाबत शेतकर्यांनी जिल्हा उपनिबंधकांना निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.
वाशिम कृषि उत्पन्न बाजार समिती वाशिम येथे बैल, म्हैस,गायी व इतर जनावरे खरेदी- विक्रीचा बाजार भरतो व अनेक शेतकरी येथे बैल, म्हैस व इतर गुरे-ढोरे विक्री व खरेदी करतात. परंतू दि. २५ ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सदर ठिकाणी शेतकर्यांना बैल बाजार न भरविण्याकरीता लाऊडस्पीकरद्वारे कोणतीही पूर्व सुचना न देता फतवा काढण्यात आल्याने शेतकर्यांनी दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान जिल्हा उपनिबंधक जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम यांना बैल बाजाराची जागा स्थलांतरीत न करण्याच्या मागणीसाठी निवेदन देवून
नियोजीत ठिकाणी गुरांचा बाजार भरवू न दिल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील रस्त्यावर बाजार भरविण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर शेतकरी शामराव रामचंद्र इंगोले, नंदू डाळ, गणेश इंगळे, कैलास इंगोले, कन्हैयालाल श्रीवैद्य, प्रशांत भेराने, गोलू डाळ, शिवमोहन गावंडे, विठ्ठल राजगुरु, शुभम केळकर, प्रविण चव्हाण, पप्पु आहेर, पंजाबराव अवगण, कैलास सुर्वे, विनोद चव्हाण, प्रकाश सावके, गजानन ठेंगडे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत