वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील
वाशिम (washim)जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठद येथील बॅक आॅफ महाराष्ट्र शाखा रिठद मध्ये कर्जदार सभासदांची संख्या,बचत गटाची संख्या, स्वतंत्र खातेदाराची संख्या, व्यापारी खातेदारांची संख्या, निराधार वृद्ध, अपंग, व्यक्ती या ग्राहकांना सेवा देता-देता मर्यादित असलेल्या अधिकारी, कर्मचारी वर्गाची संख्या पाहता बॅक आॅफ महाराष्ट्र शाखा रिठद येथे खुपचं तारांबळ दररोज होत असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या प्रश्नांची सरबत्ती पाहता शाखा प्रबंधकासह सर्व कर्मचारी त्रस्त झाले असून उत्तरे देता -देता नाकी नऊ येत आहेत.
या शाखेत सावरगाव जिरे येथील शाखा जोडून समाविष्ट केल्याने या शाखेत ग्राहकांची संख्या खुपच वाढलेली आहे.त्यातच लाडक्या बहीनी पैसे काढण्यासाठी येणाऱ्या महीलांची संख्या,त्यांचे खाते आधार लिंक करने, मोबाईल लिंक आहे का तपासने, माझ्या खात्यात पैसे का आले नाहीत?, माझ्या शेजारणीला पैसे आले माझ्या आले का नाहीत?ती बिझी जवळची आहे का?इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे देता -देता नाकी नऊ येतात.त्यामुळे इतर खातेदार पूरुष वर्गातील या महिलांच्या गर्दीमुळे बॅकेत उभे राहण्यासाठी जागा नसल्याने भाऊही या लाडक्या बहिणीमुळे त्रस्त झाला.
तर अधिकारी व कर्मचारी कमतरतेमुळे व्यवहारात अडथळे निर्माण होत आहेत.वेळेत व्यवहार होत नसल्याने पूरुष वर्गातील ग्राहकभाऊ त्रस्त झाला.तरी विभागीय कार्यालयाचे अधिकारी यांनी जादा कर्मचाऱ्यांची उपलब्धता करुन देण्यात यावी अशी बॅक आॅफ महाराष्ट्र शाखा रिठद च्या ग्राहकांची मागणी आहे.