वाशीम जिल्हा प्रतिनिधी /नारायणराव आरु पाटील
वाशिम (washim) जिल्ह्यातील जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती यांनी ऑगस्ट,सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले त्यामध्ये केकतउमरा व नागठाणा महसुली मंडळातील संपूर्ण गावाचा समावेश करावा.काही गावे सर्वे मधून वगळल्यास इतर शेतकऱ्यावर अन्याय होईल असे होऊ नये, यासाठी शेतकऱ्यास मदत व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले.
यावर्षी संततधार व अतिवृष्टीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला पाहिजे त्या प्रमाणात शेंगा धरण्याच्या प्रमाणात घट दिसून येत असल्याने अस्मानी संकटाने शेतकरी हादरला आहे.अशा अशातच रिठद येथील शेतकरी बबन श्रीराम जाधव या अत्यल्पभूधारक शेतकऱ्याने अशाच कारणाने आत्महत्या केली असल्याचे समजते त्यामुळे संपूर्ण महसुली मंडळातील गावाचा समावेश करणे गरजेचे आहे. यामुळे शासनाकडून अतिवृष्टी व पिक विम्याची मदत शेतकऱ्यांना मिळण्यास आपल्या कृतीतून मदत होईल.
निदान आपल्या एका निर्णयामुळे शेतकरी चुकीचे पाऊल उचलणार नाही. अशी अपेक्षा निवेदन दिल्यानंतर बोलतांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांनी शेतकऱ्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी निवेदन देतांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चक्रधर पाटील गोटे, नारायण काळबांडे ,गंगाराम वारभडे, बबन काळबांडे, लक्ष्मण काळबांडे, बबन सावळे, बळीराम वाकुडकर, देवानंद नखाते, आर.व्ही. नखाते यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या निवेदनावर सह्या होत्या.