Washim : शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे षडयंत्राचा भाग तर नाही ना..?,मग युरीया खतांचा रिसोड शहरात तुटवडा कसा..?

 

 

वाशीम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील 

 

रिसोड तालुक्यातील जवळपास सर्वच कृषी सेवा केंद्रानी आपल्या दुकानात युरीया हे खत उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत.शेतकऱ्यांना सद्यस्थितीत हळद,तूर आणखी इतर पिकांच्या वाढीसाठी देण्यासाठी शेतकरी सर्वच दुकानाचे दरवाजे झिजवत आहे परंतु याबाबतची वाशिम (Washim) जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कृषी अधिकारी यांना दखल घ्यावी वाटत नाही.कदाचीत शासनाने या विभागाकडे महसुली विभागासंबधीत कामे लादल्या गेली असावी अशी ओरड ऐकायला येत होती.त्यांना पी.एम.किसान योजनेअंतर्गत कामे वाढवली,शेती पीकांचे सर्वे बाबत शासनाने आदेश दिले.

 

 

शासनास इतर माहिती पूरवणे इत्यादी व त्यापेक्षा अधिक कामे असतील परंतु शेतकरी आस्मानी संकटाने घाला घातल्याने अडचणीचा सामना करत आहेत.त्यातच युरीयाच्या कृत्रीम टंचाईमुळे शेतकरी त्रस्त झाला.हे एक शासनाचे षडयंत्र तर नाही ना? शेतकऱ्यांना अडचणी आणण्यासाठी! तरी कृषी विभागाच्या वतीने शहरातील अनेक कृषी केंद्राचा युरीया खतांचा साठा किती शिल्लक आहे किंवा नाही याबाबत आढावा घेऊन युरीया खत तालुक्यात उपलब्ध करून देण्यात यावे.अशी शेतकरी मागणी करतात.याकडे तालुका कृषी अधिकारी यांनी लक्ष द्यावे.