Washim : ती चालता-चालता अचानक बंद पडली ! थोडा आराम करुन निघून जाण्याच्या तयारीत होती.

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील

 

वाशिम (washim)- रिसोड राज्यमार्ग क्रमांक ५१ ह्या रस्त्यावर एसटी बसेस चा बंद पडण्याचा दररोजचा कार्यक्रम चालू आहे. आज दिनांक १ आक्टो. ला दु.२.२३मी वाशिम ते रिसोड जाणारी बस क्रमांक एम एच ०६ S ८४३३ अडोळ नदीच्या पूलावर मध्यंतरी गाडी अचानक बंद पडली. काहीतरी नट नसल्याने ती गाडी बंद पडली. तू पुन्हा रिसोड आजारातून बोलवायचे काम पडले. त्यामुळे काम करणाऱ्यांसाठी आलेला मेकॅनिक व ड्रायव्हर कंडक्टर गाडीच्या सावलीमध्ये बसले होते.त्यामुळे अशा अनेक नादुरुस्त गाड्या एस टी महामंडळ रस्त्यावर उतरवते परंतु अशा भंगार गाड्यांमुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते. प्रवासी त्रस्त होतात वेळेत पोचत नाहीत त्यामुळे त्यांना खाजगी गाड्यांचा आधार घ्यावा लागतोय.

 

 

 

अशातच प्रवाशांना खाजगी गाडीचा आधार घेत प्रवास करावा लागला. एस टी महामंडळ चांगल्या गाड्या रस्त्यावर कधी उतरवणार ? व प्रवाशांना या त्रासातून कधी मुक्त करणार ? हा यक्ष प्रश्न प्रवाशांपुढे आहे. शासन मात्र विधानसभेच्या निवडणुकीत निवडणुका लढविण्यासाठीच व्यस्त असून नागरिकांच्या, प्रवाशांच्या कोणत्याही सुविधेकडे शासन लक्ष द्यायला तयार नाही व महामंडळ अडचणीत आहे या बाबीकडे तर बघायला वेळच नाही.शासन म्हणतं महामंडळ फायद्यात चालत आहे तर अशा भंगार गाड्या रस्त्यावर का पाठवते.त्यामुळे वाशीम मार्गावरील प्रवाशी त्रस्त झाले. दररोज बंद पडणाऱ्या एस टी गाड्याचे सत्र मात्र संपता संपेना.