washim : धर्मगुरू रामराव बापूचे स्वप्न, नगारा भवन, बंजारा विरासत, लोकार्पणाचे साक्षीदार बना !

washim

 

वाशिम जिल्हा प्रतिनीधी नारायणराव आरु पाटील

 

washim : बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरागड pohragad येथे नगारा भवनाचे लोकार्पण सोहळा पोहरादेवी येथे ५ ऑक्टोंबर ला संपन्न होत आहे. पोहरागड येथे नंगारा भवनाचे ३ डिसेंबर २०१८ ला धर्मगुरू संत रामराव महाराज यांच्या हस्ते व राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत तसेच लाखो समाज बांधवांच्या साक्षीने नंगारा भवनाचे भूमिपूजन करण्यात आले.

 

 

 

ते आता पूर्ण झाले असून या भव्यदिव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे नंगारा भवनाचे लोकार्पण दिनांक ५ ऑक्टोंबर २०२४ ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे’ cm ekanath shinde  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार बंजारा समाजाचे भूषण संजय राठोड , माजी मंत्री मनोहरराव नाईक, आमदार इंद्रनील नाईक,आमदार तुषार राठोड, आमदार राजेश राठोड, माजी आमदार निलय नाईक, माजी खासदार हरिभाऊ राठोड.संत सेवालाल महाराज यांचे वंशज धर्मगुरू बाबुसिंग महाराज,संत कबीरदास महाराज,संतोष महाराज, जितेंद्र महाराज, सुनील महाराज,शेखर महाराज

 

 

 

तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीगण राज्यातील मंत्री व बंजारा समाजाचे खासदार आमदार व लाखो संख्येने समाज बांधवांची उपस्थितीत संजय राठोड यांच्या प्रयत्नातून निर्माण केलेल्या नंगारा भवनाचे लोकार्पण सोहळा पोहरादेवी येथे ५ ऑक्टोंबर ला संपन्न होत आहे. तसेच १२ फेब्रुवारी २०२३ ला सेवाध्वज धर्मगुरू रामराव महाराज यांचे स्वप्न साकार करण्याकरिता संजय राठोड यांच्या प्रयत्नातून सेवाध्वज १५१ फूट उंचीचा पांढरा ध्वज निर्माण करून दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ ला पोहरादेवी ता.मानोरा जिल्हा वाशिम येथे भव्यदिव्य सेवाध्वज संत सेवालाल महाराज यांच्या भव्य असा अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तेव्हाचे एकमेव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे अनेक मंत्री आमदार,खासदार पदाधिकारी महाराज मंडळी लाखो समाज बांधवांच्या उपस्थित लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

 

 

 

त्यावेळेस संजय यांनी मंत्रिमंडळाच्या सहकार्याने तीर्थक्षेत्र उमरीगड व पोहरागड विकास कामाकरिता व भव्य मंदिराच्या बांधकामाकरिता ५९३ कोटी निधी मंजूर करून युद्धपातळीवर बांधकाम सुरू आहे. दिनांक ५ ऑक्टोंबर २०२४ रोजी बंजारा विरासत नगारा म्युझियम लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.संत सेवालाल महाराज धर्मगुरु रामराव महाराज बापूंच्या चरणी नतमस्तक होऊन कॅबिनेट मंत्री संजय राठोड हे बंजारा समाजाचे समस्त समाजकल्याणच्या विकासाची कामे मार्गी लावले आहेत.

 

 

 

जगप्रसिद्ध नंगारा म्युझियम भव्य वस्तू पाच मधली इमारत असून त्यामध्ये बारा विविध प्रकारच्या गॅलरी मधून बंजारा समाजाची संस्कृती पारंपारिक पुरातन सिंधू संस्कृती पासून ते परंपरेचे ऐतिहासिक अतभुत दर्शन प्रत्यक्षपणे साकारले आहे. यामध्ये लदेनी,व्यापार, साहित्य हत्यारे, वेशभूषा दागिने, लोकसंस्कृती, पुरातन बैलगाडी, गोधन मातृसत्ताक संस्कृती, राजामहाराजांना रसद पुरवठ्याचे साहित्यात हत्यारे, क्रांतिकारी शूरवीर महापुरुषांचा इतिहास संत समाजसुधारक विचारवंत ते महानायक वसंतराव नाईक, पद्मभूषण भानावतजी नाईक पर्यंतचा जीवन इतिहास असा देखावा प्रत्यक्षपणे नगारा म्युझियम या वास्तुसंग्रहालयां मध्ये देशातीलच नव्हे तर परदेशी पर्यटक आकर्षित होऊन संत सेवालाल महाराज समाधीस्थळाला चालना मिळणार आहे.

 

 

 

लोकनेता मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे आदर्श कार्यप्रणाली अंगीकारून त्यांच्या पाऊलांवर पाऊल टाकत लोकनेता बंजारा समाज भूषण कॅबिनेट मंत्री संजय राठोड धर्मगुरू डॉ. रामराव बापू यांचे स्वप्न साकार करण्यासाठी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारून बहुजनांच्या अ.भा.बंजारा समाजाच्या काशीतीर्थाचा विकास व्हावा आणि जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र शोभावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विकास कामे करीत आहे.

 

 

 

हे सर्व करीत असताना प्रशासना सोबतच स्थानिक नागरिक व संत सेवालाल महाराज यांचे वंशज धर्मगुरू बाबुसिंग महाराज,संत कबीरदास महाराज,संत सुनील महाराज ,संत जितेंद्र महाराज ,संत शेखर महाराज, सोबतच माजी आ.अनंतकुमार पाटील व समस्त पोरागड उमरीगड येथील नागरिकांना विश्वाससात घेऊन काशीतीर्थ क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून तीर्थक्षेत्र कायापालट करीत आहे. येत्या ५ ऑक्टोंबर २०२४ रोजी नगारा भवन विरासत लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.यावेळी लाखो समाज बांधवांच्या साक्षीने संजय राठोड बंजारा समाजाला एका सूचीमध्ये अनु-जमाती, एस-टी मध्ये समावेश करावे अशी धर्मगुरू रामराव बापूजी इच्छा होती ती पूर्ण करावी अशी महत्त्वाची मागणी करणार आहे.

 

 

 

सोबतच बंजारा समाजाच्या २१ मागण्या समाजाचे आमदार,खासदार लोकनेते मनोहरराव नाईक व महाराजांचे वंशज सर्व संतांच्या उपस्थित निवेदन देशाचे पंतप्रधान यांना सादर करणार आहे. तीर्थक्षेत्र विकासासोबतच बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकास व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समाज बांधवांनी या सोहळ्याचे साक्षीदार होऊन सहकार्य करावे अशी नम्र विनंती वाशीम washim जिल्ह्यातील समाजसेवक श्रावण जाधव प्रबोधनकार मालेगाव व सुरेश राठोड कारभारी वाशिम यांनी संयुक्तपणे केली आहे.