स्टेट बँक ऑफ इंडिया रिसोड मध्ये लाभार्थ्यांना त्रास, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेले निवेदन, तद्वत्ताच दिले आश्वासन! फाईल लवकर मार्गी लागतील !

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव पाटील रिसोड

 

रिसोड तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया- शाखा रिसोड मधील प्रकार मागील काही दिवसापासून पी एम विश्वकर्मा लाभार्थ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया रिसोड येथे फेऱ्या माराव्या लागत आहेत. या दोन दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडे लाभार्थ्यांची तक्रार आल्यानंतर आज दिनांक ७/१०/२०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ डांगे यांच्या मार्गदर्शनात शहराध्यक्ष विजय जाधव ,उपशहराध्यक्ष अशोक कराळे, तालुका अध्यक्ष वैभव वानखेडे, यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित उपाध्यक्ष रवी सुरवसे, लक्ष्मण वानखेडे, तालुका सचिव धनीराम बाजड, सर्कल अध्यक्ष विनोद बाजड, सामाजिक कार्यकर्ते शेख कादिर शेख निजाम उपस्थित होते.यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखाधिकारी यांनी तोंडी आश्वासन दिले.येथील फाईल सात दिवसात लाभार्थ्यांच्या मार्गी परंतु जर हे प्रश्न मार्गी लागले नाही तर मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.