Vishalgad news : विशाळगडावर तुफान राडा.तलवारीने हल्ला व दगडफेकीनंतर हिंसाचार,घरासह वाहनांची जाळपोळ.

 

Vishalgad news
Vishalgad news

 

 

Vishalgad news: काही वर्षांपासून किल्ले विशाळगडावर अतिक्रमण आहे. अतिक्रमण वाढत असताना प्रशासनांना दुर्लक्ष केलं आहे कोंबड्या बकऱ्या कापल्या जातात मद्यपान होत असून दिवसाढवळ्या जुगाराचे डाव बसतात त्यामुळे गडाचं पावित्र्य धोक्यात आला असून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी शिवभक्तांचा प्रयत्न आहे दीड वर्षांपूर्वी बैठक घेऊन विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.

 

 

 

दीड वर्षात शासन प्रशासनानं यासाठी काहीही केलं नाही असं म्हणत त्यांनी 13 जुलैला आपण स्वतः राज्यातल्या शिवभक्तांसोबत विशाळगडावर जाणार असल्याची घोषणा केली होती त्यानंतर त्यांनी या आंदोलनाची तारीख शिवभक्तांच्या सोयीनुसार 14 जुलै केल्याचं सांगितलं तर 10 जुलैला सकल हिंदू समाजाच्या वतीने विशाळगडाच्या पायथ्याला महाआरतीचा आयोजन करण्यात आलं होतं .अतिक्रमण काढण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात आता भगवेध्वज आणि जय शिवाजी जय भवानीच्या जय घोष करत हजारो शिवभक्त विशाल गडाच्या दिशेने जात आहे.

 

 

असं असताना काही लोकांनी विशाळगडाच्या पायथ्याला असणाऱ्या गावांमध्येही धुडगुस घातला या जमावाने काही घरांना लक्ष केलय आणि घर पेटवून दिलेली आहेत तर घरातलं साहित्य सुद्धा रस्त्यावर फेकून दिलाय काही गाड्यांची तोडफोड या ठिकाणी करण्यात आली आहे.जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज सुद्धा केला आहे.संभाजी राजे यांनी चलो विशालगडचा नारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर आज विशाळगडच्या पायथ्याला हजारो शिवभक्त जमणार होते मात्र विशाळगड पासून चार ते पाच किलोमीटर अंतर परिसरात जी गाव आहेत या गावांमध्ये काही अज्ञात आणि घुसून तोडफोड केलेली आहे.

 

 

घर पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात जाळपोळ केलेली आहे दोन ते तीन घरांमध्ये सिलेंडरचे स्फोट झालेले आहेत .या संपूर्ण जमावावर काबु करण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केलेला आहे .आणि या जमावला पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र “जय भवानी जय शिवाजी” !चा जयघोष करत अनेक तरुण जे आहेत हे विशाळगडच्या दिशेने आपल्याला जाताना दिसत होते.मोठा तणाव निर्माण झालेला आहे सध्या संभाजी राजे हे विशाळगडच्या दिशेने वरती गड चढतात कुठलाही परिस्थितीमध्ये अतिक्रमण संदर्भात राज्य शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण मागे फिरणार नाही हा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे.

 

 

संभाजी राजे यांच्या सोबत निवडक शिवभक्त आहेत, मात्र गडाच्या खाली अजित गाव आहे या गावांमध्ये मात्र त्यांनी या पद्धतीने तोडफोड केलेली आहे .घरे जाळण्यात आली आहेत आणि अनेकांना मारहाण देखील केलेली आहे त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये मोठा सराव निर्माण झालाय आणि या गावाला सध्या पोलीस चौकीत स्वरूप प्राप्त झालेला आहे. विशाळगडावर प्रशासनाने जमावबंदी कायदा लागू केला आहे.