हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धडक मोर्च्याच्या इशाऱ्यानंतर पोलिस हलले; वामन यंगड प्रकरणात मोठी अटक कारवाई

On: March 29, 2026 8:14 AM
Follow Us:
वामन यंगड मृत्यू प्रकरणात 10 दिवसांनी आरोपींना अटक करताना बुलढाणा पोलिस
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

बुलढाणा | २९ मार्च २०२६

वामन यंगड मृत्यू प्रकरणात अखेर 10 दिवसांनंतर मोठी कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे माळवंडी परिसरात मोठा संताप उसळला होता.

19 मार्च रोजी काही व्यक्तींनी वामन यंगड यांना घरातून सोबत नेले होते. काही वेळानंतर त्यांना मृत अवस्थेत परत आणण्यात आले. त्यांच्या मृतदेहावर गंभीर जखमांच्या खुणा आढळल्याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.मृताचे कपडे बदलण्यात आल्याची बाब समोर आल्याने संशय अधिकच वाढला. डोक्यावर झालेल्या गंभीर वारामुळे ही घटना अधिक गंभीर बनली होती.

घटनेनंतर अनेक दिवस पोलिसांकडून ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढत होता. आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचे आरोपही करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. अखेर या दबावानंतर पोलिसांनी 27 मार्च रोजी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात समाधानाचे वातावरण असून उशिरा का होईना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

👉 अशाच ताज्या अपडेट्ससाठी Kattanews.in ला भेट द्या आणि आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा.

Related News

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment