नारायण आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी
रिठद गावातील नवतरुण विचारधारेच्या युवकांनी त्रिमूर्ती गणेश मंडळ स्थापन करुन श्री गणरायाच्या मिरवणुकीत रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मिरवणुकीत प्रथम स्थान देऊन ट्रॅक्टर मध्ये आकर्षक छत्रपतीची मूर्ती ठेवण्यात आली.त्यानंतर अश्वाला स्थान देत पालखी मध्ये बसलेल्या गणरायाच्या मुर्तीस पालखीमध्ये बस ऊन मिरवणूक काढण्यात आली.
ह्या मिरवणुकीत सर्वच तरुण मंडळींनी भजन,गौळणी, भक्तीगीते गात अनेक जेष्ठ पूरुष,महीला सहभागी होऊन विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत त्रिमूर्ती गणेश मंडळाने या मिरवणुकीत प्रत्येक समाजातील तरुणांना आकर्षित करणारा देखावा होता.तर तरुणांनी डि.जे.बॅन्ड इतर वाद्यांचा वापर न करता कर्कशता व प्रदुषण होणार नाही याची काळजी त्रिमूर्ती गणेश मंडळाने घेतली हे विशेष या विसर्जन मिरवणूक होते.असाच आदर्श सर्व गणेश मंडळानी द्यावा.असे आवाहन त्रिमूर्ती गणेश मंडळाने यावेळी केले आहे.