चोर कधी खिसा कापतो कळत नाही, त्याप्रमाणे सरकारनं सर्वसामान्यांचा खिसा कापने चालू केले ?

खिसा

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील

 

 

 

चोर कधी खिसा कापतो कळत नाही, त्याप्रमाणे सरकारनं सर्वसामान्यांचा खिसा कापने चालू केले ? सरकारने लाडक्या बहिणीचे लाड पुरवता -पुरवता भाऊजीच्या खिशाला कधी कात्री लावली कळलेच नाही, एका हाताने बहिणीला कुचकरायचे आणि दुसऱ्या हाताने हळूच भाऊजीच्या ‘खिशात डल्ला’ मारण्याचे धोरण सरकारने अवलंबले असून लाडक्या बहिणीसाठी वर्षाला ४७ हजार कोटी रुपये आणायचे कुठून हा प्रश्न जनतेच्या मनात वारंवार निर्माण होत आहे म्हणून जीवनावश्यक वस्तूमध्ये डाळीचे आणि गॅसचे gas भाव वाढविले ठेकेदाराचे हजारो कोटी रुपये देणे बंदच केले म्हणून ठेकेदारांनी सर्व विकासकामे बंद ठेवली.

 

 

 

महानगरपालिका mahanagarpalika दर महिन्याला वस्तू आणि सेवा कर च्या माध्यमातून (जीएसटी) मधून मिळणाऱ्या रकमेत कोणतेही कारण न देता अचानक तीन ते चार कोटी रुपयांची कपात करण्यात आली व राज्यातील २७ महानगरपालिकांना मिळणारे अनुदानात अशाप्रकारे कटोती करून शेकडो कोटी जमा केली अनेक अनुदाने अचानक बंद केली. तरीही तूट भरून निघेना म्हणून आता सर्वसामान्यच्या रोजच्या वापरात येणारे शंभर आणि दोनशे रुपयांचे मुद्रांक स्टॅम्प पेपर बंद केल्यामुळे कमीत कमी पाचशे रुपयांचे मुद्रांक सामान्य नागरिकांना खरेदी करावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना प्रतिज्ञापत्रे,वाटणीपत्र, लग्ननोंदणी, भाडेकरार, सामंजस्य करार, खरेदी विक्री करार, बँक, न्यायालय, विविध कामासाठी स्टॅम्प पेपरची गरज भासते यासाठी रुपये १०० चे स्टॅम्प पेपरवर हे सर्व ग्राह्य धरली जातात.

 

 

 

मात्र आता थेट रुपये पाचशेचा स्टॅम्प खरेदी करण्यासाठी वर रुपये ५० ज्यादा आणि टायपिंग करण्यासाठी २०० असा भला मोठा भुर्दंड सामान्य नागरिकांवर पडणार आहे. मात्र सरकारच्या तिजोरीत चार पट जादा रक्कम जमा होणार आहे.ही सर्व रक्कम लाडक्या बहिणीच्या नवऱ्याच्या खिशातून लुटली जाणार आहे. जी बायको नवऱ्याचा अख्खा पगार घेऊन नवऱ्याचे ऐकत नाही, ती लाडकी बायको सरकारचे पंधराशे रुपये घेऊन त्यांना मतदान करतील का हा प्रश्नच आहे. तरीही सरकार सष्टे.ऑक्टोबर, नोव्हेंबर या तीन महिन्यात जुलै आणि नोव्हेंबर महिन्यापर्यंत पैसे १० ऑक्टोबरला देणार आहे सरकारचा हा सर्व आटापिटा मते मिळवण्यासाठी असून त्यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशा प्रकारे जनतेच्या खिशावर डल्लाच मारला जाणार आहे. हे मात्र सत्य नाकारता येणार नाही.