अनेक संघटनांच्या वतीने आज भारत बंदची हाक दिली होती. सविस्तर वृत्त असे की सुप्रीम कोर्टाने दिनांक ०१/०८/२०२४ रोजी अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून त्यांना क्रिमिलियर लावणे हा निर्णय दिला होता.या निर्णयाच्या विरोधात अनेक संघटनांनी आज बंद पुकारला होता. तेव्हा आज दुपारी 12:30 दरम्यान जालना ते सिंदखेडराजा रोडवरील नाव्हा या ठिकाणी अज्ञात जमावांनी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी ST दोन बसेस फोडण्यात आल्या. परंतु या बस फोडण्यामागील कारण आंदोलन कि दुसरे काही अद्याप कळू शकले नाही. वृत्त लिहीपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही.