सोयाबीन खरेदी केंद्र लवकरच होणार सुरू, सोयाबीन ला मिळाला प्रतिक्विंटल एवढा हमीभाव ,बघा सविस्तर किती दिवस राहणार खरेदी केंद्रे सुरू..??

 

 

बुलढाणा प्रतिनिधी 

 

केंद्र सरकारने महाराष्ट्र वकर्नाटक या दोन राज्यांमध्ये ३ महीन्यांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. नाफेड व एनसीसीएफद्वारे ही खरेदी केली जाईल. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून यासाठी पाठपुरावा केला होता.

 

 

 

केंद्रीय कृषी मंत्रालयाने समर्थन मूल्य योजनेच्च्या अंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके ९० दिवसांसाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही ४८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली असून,यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी देखील वारंवार संपर्कात होतो, असेही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

 

 

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांसह वेळोवेळी पाठपुरावा व समर्थन देणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.