सिंदखेड राजा येथील उत्कर्ष महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा.

 

 

सिंदखेडराजा प्रतिनिधी 

सिंदखेड राजा येथील उत्कर्ष कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला.भारताला ग्रंथालय क्षेत्रात जागतिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे डॉ.एस आर रंगनाथन यांचा ग्रंथालयाच्या विकासात मोठा वाटा आहे. डॉ. रंगनाथन यांच्या ग्रंथालायशास्त्राचे पाच सिद्धांत,द्विंबिंदू वर्गीकरण या ग्रंथाशिवाय ग्रंथालय शास्त्राचा अभ्यास पूर्ण होत नाही असे मत प्रमुख वक्ते डॉ.संगीता बावस्कर यांनी केले.

 

 

डॉ.एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संदीप अवसरमोल उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उप प्राचार्य सुनील सुरूले हे होते.अध्यक्षीय समारोपात सुनील सुरुळे म्हणाले वाचन संस्कृती आपण सर्वांनी जोपासली पाहिजे.व प्रत्येकाने पुस्तकासोबत मैत्री केली पाहिजे असे प्रतिपादन केले. प्रा. मल्लिकार्जुन कोथळीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्न्हेकिता पूंडकर यांनी केले.प्रा. वीरेंद्र तायडे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रा.संदीप अवसरमोल यांनी केले.

 

 

 

याप्रसंगी डॉ. अरुण वाळके डॉ. पवन खरात प्रा. पांडुरंग तांबेकर प्रा.अक्षय कुरगळ प्रा. श्रद्धा महाजन प्रा. अजिंक्य गायकवाड प्रा. नरहरी राऊत शुभम भाग्यवंत,विश्वंभर मराडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते