latest news : गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ हाणून पाडण्यासाठी साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीने विद्यार्थ्यांना रोखले

latest news

 

संतोष गाडेकर / साखरखेर्डा

 

latest news : गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव’ व्हावा आणि त्यांना प्रेरणा मिळावी असा दूरदृष्टीकोण समोर ठेवून गतवर्षी प्रमाणे यंदाही विदर्भ न्याय परिवाराने पुढाकार घेऊन दहावी, बारावीमध्ये प्रथम, तसेच नीट, आय.आय.टी. मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि इतर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांचा दिमाखदार सत्कार सोहळा श्री मज्जगदगुरू पलसिध्द महास्वामींच्या दरबारात आयोजित करण्यात आला होता.

 

 

 

यामध्ये स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल, जिजामाता विद्यालय, उर्दू हायस्कूल तसेच साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीच्या sakharkherda education society श्री मज्जगदगुरू पलसिध्द महास्वामींच्या दरबारात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्याला एस.ई.एस. हायस्कूल व क. महाविद्यालय वगळता उपरोक्त सर्वच शाळांनी हजेरी लावली मात्र आमच्या अध्यक्षाचे नांव कार्यक्रम पत्रिकेत खाली आले म्हणून संचालक मंडळाने कार्यक्रम उधळून लावण्यासाठी आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रोखले. मात्र त्याच हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी सत्काराचा आदरपूर्वक सन्मान स्विकारला.

 

 

 

नांव खाली-वर झाल्याचे कारण देत संस्थेचे प्राचार्यांनी देखील कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने विद्यार्जनाचे काम करणाऱ्या या संस्थेचे अक्षरशः अकलेचे दिवाळे निघाले की काय असा यक्षप्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. केवळ संस्था / सचिवाचे नांव कार्यक्रम पत्रिकेत खाली-वर छापले म्हणून संस्था रुसून बसण्याची घटना नवीन असली तरी मग शाळेत काही विद्यार्थी मागच्या बाकावर बसवले म्हणून त्यांनी दाखले काढावे का? असा प्रश्नही उपस्थित होतो. साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटी sakharkherda education society ही गावातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून या संस्थेतून अनेक पिढ्या घडल्या आहेत. एस.ई. एस. हायस्कूल ही संस्था सगळ्यांची माय आहे ती आजवर सर्वांना सोबत घेऊन जात असतांना आताशा नव्या संचालक मंडळाने विद्यार्थ्यांच्या अशा प्रेरणादायी उपक्रमांना ठेंगा दाखवून आपल्या आकलन शक्तीचा एक प्रकारे परिचय करून दिल्याची चर्चा शैक्षणिक क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.

 

 

 

खरे तर गुणवंतांच्या गुणगौरव सोहळ्याची या ऐतिहासिक संस्थेने व्यापक रूप देऊन तयारी करायला हवी होती. परंतु संस्थेने असे औदार्य न दाखवता आपण करायचे नाही आणि दुसऱ्याने केले तर बहिष्कार टाकायचा अशी भूमिका घेणे निदान विद्यार्थ्यांसाठी तरी अनाकलनीय असल्याचे स्पष्ट होते विद्यार्थी हितावह पर्वणी ठरलेल्या या कार्यक्रमाकडे केवळ नांव निमंत्रण पत्रिकेत खालीवर झाले झाले म्हणून राजकीय सुड उगवत दस्तुरखुद्द एस ई एस एज्युकेशन सोसायटीने पाठ फिरवल्याने पालक विद्यार्थ्यांत नाराजी व्यक्त होत आहे.