सिंदखेडराजा मतदारसंघात वारे वेगळेच ..!!! डॉ. शिंगणे नी हाती तुतारी घेतल्यामुळे गायत्री शिंगणे निष्ठावंतांना हाच का न्याय म्हणत अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत.

सिंदखेडराजा

 

 

 

सिंदखेडराजा/प्रतिनिधी 

 

सिंदखेडराजा (sindkhedraja) मतदारसंघात राजकारणाचे वेगळेच वारे वाहत आहेत. काका डॉ. राजेंद्र शिंगणे हे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांची पुतणी, कु. गायत्री गणेश शिंगणे ह्या ठामपणे शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून त्यांनी सिंदखेडराजा मतदारसंघात पक्षाला पडणारे खिंडार थांबवले. वेगवेगळी आंदोलने करून संघटनात्मक बांधणी केली. निवडणूक लढविण्याची तयारी त्यांची अंतिम टप्यात आली होती, मात्र त्याचक्षणी काका डॉ. शिंगणे हे पुन्हा पवार गटात परत आल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे.असे असलेतरीही, हाच का निष्ठावंतांना न्याय ? असा प्रश्न गायत्री यांनी उपस्थित करून, अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे संकेतच माध्यमांशी बोलताना दिले !