sindkhed raja rajwada : धक्कादायक ! अखेर का तोडली माँ जिजाऊंच्या जन्मस्थळावरील जुनी झाडं…

sindkhed raja rajwada

 

 

दिपक नागरे / प्रतिनिधी

 

sindkhed raja rajwada  : येथील माँसाहेब जिजाऊ maasaheb jijau यांचे जन्मस्थान असलेल्या राजवाड्या समोरील नारळाची शोभिवंत वृक्षराजी तोडण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने ही वृक्षराजी तोडली असून, त्या वृक्षांमुळे राजवाडा पूर्णपणे दिसत नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. नव्हेतर या संदर्भात अनेक तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे.

 

 

अनेक वर्षांपासून राजवाड्यासमोर असलेल्या वृक्षराजीच्या या कत्तलीमुळे राजवाड्याची शोभा गेल्याचे स्थानिक रहिवासी म्हणत आहेत. तर उलट ‘राजवाडा’ पूर्णपणे दिसत असल्याने शोभा वाढली असे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. एकंदरीत पुरातत्व विभागाने झाडांची कत्तल केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रशासनाने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी वेळ येऊन ठेपली आहे, एवढे मात्र खरे.