sindkhed raja : सिंदखेड राजा sindkhed raja तत्काळ पद भरती करून मातृतिर्थातील जनतेच्या समस्या सोडवण्याची मागणी शहरासह परिसरातील नागरिक करत आहेत तालुक्यातील तहसीलदार तथान्याय दंडाधिकारी म्हणून असलेले पद गेल्या एप्रिल महिन्यापासून प्रभारी म्हणून आहेत आणि प्रभारी तहसीलदार सुद्धा वैद्यकीय रजेवर गेले असल्याने प्रभारी तहसीलदाराचा पदभार नायब तहसीलदाराकडे प्रभारी देण्यात आला आहे. लाडक्या भाऊ बहिणीसह नागरिकांचे कामे केव्हा होणार आणि कायमस्वरूपी तहसीलदार केव्हा मिळणारअसा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
सिंदखेडराजा sindkhed raja तालुका हा मोठा तालुका असल्याने व तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र देखील मोठे असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या बहुसंख्य नागरिकांना तहसील कार्यालयात विविध कामासाठी चकरा मारावे लागत आहे नायब तहसीलदारांचे nayab tahashildar एकूण चार पदे आहेत. त्यापैकी फक्त दोन पदे भरलेले आहेत त्यामध्ये एक निवडणूक विभागात नायब तहसीलदार म्हणून आहे काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्या अनुषंगाने निवडणूक विभागातील तहसीलदारांना नायब तहसीलदार nayab tahashildar नसल्याने विविध मीटिंग यासह निवडणूक विभागातील विधानसभेच्या निवडणुकीचे विविध कामाचा प्रचंड व्याप असल्याने निवडणूक विभागातील तहसीलदारांना इतरत्र काम करणे शक्य होत नाही. त्यामध्ये दुसरे नायब तहसीलदार nayab tahashildar म्हणून आस्मा मुजावर असून त्यांच्याकडे निवासी नायब तहसीलदार, अतिरिक्त महसूल नायब, तहसीलदार यांचा पदभार आहे.
यामध्ये निवासी नायब तहसीलदारांचा nayab tahashildarकारभार करत असताना दिवसभरात ५०० ते ७०० विविध दाखले त्यांना द्यावा लागत आहे तसेच महसूलचे विविध कामे न्यायालयीन प्रकरणे यासह विविध कामे करावे लागत आहे. तसेच अवैध रेतीसह ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची जबाबदारी देखील त्यांच्याकडे आहे. दिवसभरात येणारे अर्ज, निवेदन, व नायब तहसीलदारांना विविध कामासाठी या सर्व बाबीकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन सिंदखेड राजा येथे दोन नायब तहसीलदार व एक तहसीलदारांची तत्काळ पद भरती करून मातृतिर्थातील जनतेच्या समस्या सोडवण्याची मागणी शहरासह परिसरातील नागरिक करत आहेत