राज्यात महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना लागू केली. व या योजनेसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन लाडक्या बहिणी च्या खात्यात दीड हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे 3000 रुपये बँक खात्यात जमा केले, त्यामुळे लाडकी बहीण तर खुश आहे मात्र दाजींच काय..?? तर दाजींना रडण्याची वेळ येत आहे.
परंतु लाडक्या बहिणीला दिले जाणारे हे पैसे दाजींच्या सोयाबीन मधून तर ढापले जात नाहीत ना.. सोयाबीनला सरकारचा हमीभाव 4900 प्रति क्विंटल मिळतो, परंतु सरकारच्या अस्थिर धोरणामुळे सध्या बाजारातील परिस्थिती बघता 4000 रुपये प्रतिक्विंटल दराने ही सोयाबीन खरेदी करण्यासाठी व्यापारी धजावत नाहीत. यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल हजार रुपये कमी भाव येत आहे. दाजींच्या प्रतिक्विंटल मागे हजार रुपये ढापुन .. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दीड हजार रुपये देऊन बहिणीला मात्र खुश केलं जात आहे परंतु दाजीचं काय…? असे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
यंदा खरीप हंगाम वेळेवर पूर्ण झाल्याने पावसाच्या कमी-जास प्रमाणामुळे जेमतेम सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येणार आहे. अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे. सध्या नवीन सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच नवीन सोयाबीनची खरेदी सुरू झालेली आहे. सोयाबीनचे कोसळलेले दर पाहून सोयाबीन उत्पादनासाठी केलेला खर्चही निघतो की नाही या विचारानेच शेतकरी दाजी हवालदिल झाले आहेत…
हमीभावापेक्षा हजार रुपये कमी दराने सध्या सोयाबीनची खरेदी सुरू असल्याने शेतकरी दाजी व रडण्याची वेळ आली आहे लाडकी बहीण दीड हजार रुपयावर खुश असली तरीही कर्जात बुडालेला शेतकरी दाजी मात्र आर्थिक चक्रव्यूहात अडकून पडलेला आहे एवढे मात्र नक्की आहे.