विनापरीक्षा सनदी जागा भरणे हा SC,OBC,NT व आर्थिक दुर्बल यांच्यावर व संविधानावर हल्लाच.- राहुल गांधी.

 

 

विना परीक्षा सनदी अधिकाऱ्यांची निवड करणे हा संविधानावर केलेला हल्लाच होय अशी खरमरीत टीका राहुल गांधी यांनी केली.दलित, ओबीसी,आदिवासी (SC,OBC,NT) हक्क हिरावून केंद्र सरकारच्या सेवेत लोकांची मोदी सरकार थेट भरती करत आहे. बहुजनांच्या राखीव जागा भाजपने हिसकावून घेतल्या आहेत, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला.

 

 

केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी असलेल्या पदांवर रा. स्व. संघाच्या लोकांची थेट भरती केली, अशी टीका काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.नोकऱ्यांमध्ये थेट भरती हा दलित, ओबीसी, आदिवासींच्या हक्कांवर थेट हल्ला आहे. भाजप रामराज्याचे नाव घेत हे गैरप्रकार करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

 

एमपीएससीऐवजी विनापरीक्षा व केवळ मुलाखत घेऊन थेट सनदी नोकऱ्या देणे हा संविधानावर हल्ला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. कालच सरकारने विविध विभागातील ४५ सनदी नोकऱ्या थेट देण्याची जाहिरात दिली होती. यावर विरोधकांनी प्रचंड टीका केली आहे.काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने केंद्रातील मोदी सरकारतवर आरक्षणाच्या मुद्यावरुन टीका करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारवर आरक्षण, सरकारी पदभरतीचा आरएसएससोबत संबंध जोडत हल्लाबोल केला आहे.