शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना अटक करा; भीमशक्तीचे आंदोलन.

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/ नारायणराव आरु पाटील   

 

दिनांक १८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार श्री.चंद्रकांत हंडोरे प्रणित भिमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने प.विदर्भ अध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेसचे सचिव श्री. दिलीप भोजराज यांच्या नेतृत्वात आ.संजय गायकवाड यांना तात्काळ अटक करून कारवाही करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. प्रदेश काँग्रेस महासचिव ऍड दिलीपराव सरनाईक,

 

भीमशक्ती जिल्हाध्यक्ष गजानन खरात, मधुकरराव जुमडे, भीमशक्ती जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सुषमाताई पराड,परशुरामजी भोयर,समाधान माने, उत्तमराव खडसे, समाधान जवंजाळ, प्रफुल्ल बेलसरे,भीमशक्ती महिला शहर अध्यक्ष रेखा पट्टेबहादुर, धोंडूजी राऊत, संजय पडघान, संविधान ढोले, ऍड.अंभोरे, आदी पदाधिकारी व कार्यक्रते उपस्थित होते.

 

 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार श्री. राहुलजी गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करून शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी असे म्हटले होते की, “जो कोणी राहुलजी गांधीं यांची जीभ छाटेल त्याला ११ लाख रुपये बक्षीस देण्यात येईल.”या वक्तव्याचा भीमशक्तीच्या  वतीने तीव्र निषेध व्यक्त करून आमदार संजय गायकवाड यास तात्काळ अटक  करून कडक कारवाही करावी या मागणीसाठी तसेच श्री.राहुलजी गांधी यांच्या समर्थनार्थ निषेध “धरणे आंदोलन” करण्यात आले.तसेच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल महोदय यांना निवेदन देण्यात आले.