sanjay gaikwad : शिवसेना ‘उध्दव बाळासाहेब ठाकरे’ गटाचा भव्य मोर्चा आज सोमवार २३ सप्टेंबर रोजी बुलढाण्यात buldhana निघाला होता, या मोर्चात खा. अरविंद सावंत व विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे यांचेसह जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर narendra khedekar यांनी स्थानिक आमदार संजय गायकवाड यांना टिकेचे लक्ष्य केले. आ. गायकवाड यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनीही या मोर्चावर सडकून टिका केली.
या मोर्चासाठी एकही व्यक्ती स्वतःहून आला नव्हता, असा आरोप त्यांनी करून सर्व लोकांना पैसे देवून मोर्चात आणल्याची टिका केली. तर लोकांमधून निवडून न येणाऱ्या दानवे यांनी माझ्यावर बोलण्याची औकात काय? असा सवाल त्यांनी उपस्थित करुन दानवेंना कु.. संबोधून त्यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टिका केली. आ. संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर खरपूस टिका करतांना ते पुढे म्हणाले की, अंबादास दानवे ambadas danve हा विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आहे.
तो मागच्या दाराने निवडून येतो, त्याची लायकी काय? त्यांनी जनतेमधून आमच्यासारखे निवडून यावे मग समजेल आम्हाला की तू लोकप्रतिनिधी आहे.. शिवरायांचा मालवणचा पुतळा तो काही सरकारनं नाही बांधला तो नेव्हीच्या लोकांनी बांधला आहे. तो जो काही इथे भुकून गेला, ते सारे खोटे विषय आहेत. तो एका गलीतल्या टपरुट नेता असल्याचाही घणाघात शेवटी आ. संजय गायकवाड यांनी केला