नारायणराव आरु पाटील/प्रतिनिधी
रिसोड QR कोड घोटाळा प्रकरण सध्या शहरात मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. कचरा व्यवस्थापनासाठी नगरपरिषदेमार्फत नागरिकांच्या घरोघरी QR कोड लावण्यासाठी तब्बल ₹60 ते ₹70 लाख खर्च करण्यात आला. मात्र प्रत्यक्ष वापर कुठेच दिसत नाही. रिसोड QR कोड घोटाळा असल्याची शंका नागरिक व्यक्त करत आहेत. कचरा संकलनासाठी QR स्कॅनिंग होत नसल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे, त्यामुळे रिसोड QR कोड घोटाळा हा जनतेच्या पैशाच्या गैरवापराचा गंभीर मुद्दा ठरतो. या सर्व प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य असल्याने रिसोड QR कोड घोटाळा प्रकरणात चौकशीची मागणी सातत्याने वाढत आहे.
या प्रकल्पात ICT BASED (ITI) (LTD) या कंपनीच्या गोटात लाखो रुपये घालण्यात आल्याचा संशय आहे. या गंभीर अनियमिततेबाबत विजय लक्ष्मण झुंजारे यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी रिसोड, तहसीलदार व जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
झुंजारे यांनी सांगितले की, “कचरा व्यवस्थापन प्रणाली लागू झालेलीच नाही, QR स्कॅनिंग करणारा एकही कर्मचारी आजवर शहरात दिसला नाही. मग एवढे लाखो रुपये कुठे गेले? हे स्पष्ट केलेच पाहिजे.”
याबाबत तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. “गरज पडली तर आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलू!”, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.
हे पण वाचा.
नागरिकांची मागणी :
- प्रकल्पातील सर्व बिलांची खुली चौकशी करावी
- सदर कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे
- जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी
- जनतेचा पैसा वसूल करावा
या संपूर्ण प्रकरणाकडे रिसोड शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, पारदर्शक चौकशी आणि ठोस कार्यवाहीची प्रतीक्षा आहे.
👉 तुमचे मत काय आहे? खाली कमेंट करा आणि ही बातमी शेअर करून प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवा.










