वाशीम जिल्हा प्रतिनिधी /नारायणराव आरु पाटील
रिसोड शहरातील माहात्मा फुले गणेश मंडळाची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा कायम जपत जेष्ठा पासून तरुणाई सोबत, लहान बालक त्यामध्ये मुले, मुली कायम शिवकालीन परंपरेचा वारसा चालवत आजतागायत चालू आहे.हे गणेश मंडळ अंनतचर्तुदशीला गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशासह शिवकालीन ढाल- तलवार, दांडपट्टा,लाठी-काठी,काठीने अचूक निशाण्यावर नारळ फोडणे, इत्यादी परंपरागत मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवत या मंडळाचा कायम नावलौकिक शहरात आहे.
आणी शिस्तबद्ध पद्धतीने जेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनात हि मिरवणूक काढली जाते.जेष्ठ मंडळीचा हे मंडळ कायम सन्मान करत आले आहे.यामध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख संजय इरतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हि मिरवणूक काढण्यात आली.त्यांनी सुद्धा लाठी-काठी खेळून प्रात्यक्षिक दाखविले.हि मिरवणूक काढतांनी या खेळाच्या साहित्याची पूजा केल्यानंतरच सुरुवात केली जाते.त्याच प्रमाणे यंदाही तशीच सुरुवात झाली.या मिरवणूकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.शांततेत मिरवणूक पार पडली.यासाठी रिसोड पोलीस स्टेशन कडून चांगला बंदोबस्त ठेवण्यात आला होता.