
नारायणराव आरु पाटील,वाशिम/प्रतिनिधी
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरीच जिवाभावाचा सोबती म्हणजे बैल.शेतकऱ्याच्या मातीत मिसळलेल्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा एकमेव प्रामाणिक साक्षीदार म्हणजे बैल!गेल्या कित्येक पिढ्या दोघही इमानेइतबारे राबतच आहेत.राब राब राबूनही शेतकऱ्याच्या वाट्याला केवळ बेदम कष्ट आणि हुकलेल्या आर्थिक गणितानं वाट्याला आलेलं दारिद्र्य हेच चक्र पिढ्यानपिढ्या सुरू आहे.नित्यनेमानं येणारी संकटं, पोराबाळाची आणि संसाराची आबाळ,बायको आणि पोरींची काळजी,
कधीही न पुरवता आलेला लेकरांचा नव्या कपड्यांचा आणि भातक्याचा हट्ट…..अशी सगळी घालमेल शेतकरी ज्या एका मुक्या जिवापुढं हक्कानं केवळ डोळ्यांनं व्यक्त करत आला.आणि त्या मुक्या जीवानही त्याला अश्या अनेक प्रसंगात न बोलता धीर दिला तो एकमेव पुण्यवंत आत्मा म्हणजे बैल! शेतीची आणि मातीची प्रामाणिक सेवा करणाऱ्या शेतकरी राजा व आमच्या लाडक्या बैलांच्या आयुष्यात कायम आनंद राहावा यासाठी आम्ही नेहमीच वचनबद्ध आहोत. मराठी कट्टा परिवारातील सर्वच शेतकरी बांधवांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!