नारायणराव आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी
रिसोड मध्ये एका अलपवयीन मुलीला तीन नरधामनी शेतातील झोपडीतून रात्रभर बळजबरीने बलात्कार केला ही घटना माणुसकीला काळीमा फसवणारी असून अशा नरधामाना दगडांनी ठेचून मारले पाहिजे अशी संत संतप्त प्रतिक्रिया माजी सभापती विश्वनाथ सानप यांनी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे पूर्वी च्या गुन्ह्यात सामील असलेल्या मुख्य आरोपी पंढरी फुफाटे यांच्यावर दीड वर्षापूर्वी त्यांच्याच गावातील एक लहान मुलीवर जबरन संभोग करण्याचा 370 कलमाने गुन्हा दाखल असतानांही सदर फरार असलेला आरोपी मुक्तपणे रिसोड परिसरात फिरत होता.
याला पोलिसांचे अभय असल्याचे दिसत होते. या नरधामाने अनेक लहान मुलींना बरेच वेळेस आपले लक्ष केले असल्याचं त्या भागातील लोकांकडून बोलले जाते, रिसोड ची घटना पोलिसांच्या नारकर्तेपणामुळे घडून आली आहे. कारण मुलगी घरी आली नाही म्हणून आई-वडिलांनी शोध घेतला असता आढळून न आल्याने पालकांनी त्या रात्रीला पोलीस स्टेशनमध्ये आले असता पोलिसांनी त्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊन अपहरणाचा रिपोर्ट द्यायची गरज नाही, जबाबदार अधिकारी नाही.
म्हणून रिपोर्ट न घेताच काढून दिले पैशाचे प्रकरण असते तर सर्व अधिकारी हजर झाले असते परंतु गरीब माणसाला कोणी वाली असतो का ? या प्रकरणात मुलगी दुसऱ्या दिवशी जेव्हा या नरधामाच्य्य तावडीतून सूटून आली तेव्हा आई-वडिलांनी तिला पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी अपहरर्णाचा गुन्हा नोंदवून तात्पुरता गुन्हा दाखल करून मुलीच्या आई-वडिलांना पोलीस स्टेशन म्हणून काढून दिले परंतु पीडित मुलगी सांगत होती की माझ्यावर या नरधामानी बलात्कार केला तर अपहरणाचा गुन्हा का नोंदवला.
पीडित मुलीचा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर बलात्कार झाल्याचे नीष्पन्न झाले. तेव्हा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. रिसोड चे ठाणेदार तर केव्हाच पोलीस स्टेशनला रात्री नसतात तसेच त्यांचे वाशिमला नेहमी जाणे असते व रात्रीला वाशीम येथेच मुक्कामी असतात. आज रोजी पोलीस स्टेशनचा कारभार सर्व वाऱ्यावर सुटलेला आहे काही कर्मचारी त्यांच्या हिशोबाने लोकांकडून पैसे उकळतात असा खालच्या दर्जाचा कारभार पोलिसांचा कधीच पाहिला नाही. असे विश्वनाथ सानप यांनी सांगितले.
विशेष बाब म्हणजे एवढ्या मोठ्या गंभीर गुन्ह्यांत रिसोड पोलीस माननीय न्यायालयात आरोपींना पोलीस कस्टडी मागू शकत नाही यापेक्षा काय बोलावे, आरोपीना बळ देण्याचे व गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची कृती पोलीस विभाग कडून होत असलेली दिसत आहे.असे माजी सभापती तथा शिवसेनेचे रिसोड विधानसभा समन्वयक विश्वनाथ सानप यांनी बोलतांना संताप व्यक्त केला.