रिसोड शहरात विश्राम गृह जवळील भर वस्तीत सुरू आहे कुंटणखाना, परिसरात नागरिक व महिला यांचे कुंटणखाना बंद करण्यासाठी दिले निवेदन.

 

 

नारायणराव आरु पाटील वाशिम/ प्रतिनिधी 

 

रिसोड शहरातील स्थानिक विश्राम गृह हिंगोली रस्त्यालगत तसेच उत्तमचंद बगडिया यांच्या कॉलेज परिसर वस्ती जवळ कुंटणखाना बिन दिक्कत पणे सुरू असून याबाबत स्थानिक नागरिक व महिलांनी ठाणेदार भूषण गावडे यांना निवेदन दिले व कुंटणखाना बंद करण्याची मागणी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त व निवेदनात दिलेल्या माहितीनुसार शहरातील स्थानिक विश्रामगहाजवळच व हिंगोली रोड कॉलेज परिसर वस्ती लगत एका महिलेने व तिच्या मुलीने अतिक्रमणाच्या जागेत वास्तव्य करून कुंटणखाना सुरू केला आहे.

 

 

 

समर्थ नगर माणुसकी नगर व हिंगोली रोड कडून तहसील कार्यालया जवळील वर्दळीच्या ठिकाणी कुंटणखाना राजरोसपणे सुरू आहे.याजवळ गावरान दारूचे अड्डे आहे आंबटशौकीन मंडळी दारू पिऊन सदर कुंटण खाण्यावर सर्रास जाऊन आपली हाऊस भागवतात व दारू पिऊन अर्वाचे भाषेत शिविगाळ करतात शहराजवळील मराठवाडा परिसरातील युवती येथे गोळा करून सदर महिला बिनधास्तपणे चालवत आहे या देह विक्री व्यवसायातून महिन्याकाठी लाखो रुपयाची उलाढाल सुरू आहे मात्र परिसरातील नागरिक महिलांच्या वर्दळीच्या रस्त्यावर सदर कृत्य सुरू असल्याने हा त्रास शेजार्यां पाजार्ना येणाऱ्या जाणाऱ्या शाळकरी मुलामुलीना त्रास सोचावा लागत आहे.

 

 

 

याबाबत सदर महिलेची नागरिक बोलले असता उलट जबाबी धमकी देऊन पोलीस‌ स्टेशनमध्ये तुमची तक्रार करुन तुमचेविरुद्ध कारवाई करील अशी धमकी देत आहे यामुळे परिसरातील नागरिक महिला त्रास होत असल्याने त्यांनी ठाणेदार यांना निवेदन देऊन कुटन खाना बंद करण्याची मागणी केली आहे निवेदनावर शेख अमजद शेख बाबू संजय अंभोरे नगरसेविका पप्पीबाईकदम लक्ष्मी जुमडे दुर्गा सिरसागर नमिता शिरसागर बळीराम गायकवाड यांच्यासह असंख्य नागरिक व महिलांच्या सह्या आहेत.

 

 

प्रतिक्रिया :- पोलीस निरीक्षक. भूषण गावंडे. रिसोड पोलिस स्टेशन रिसोड. पथक स्थापन करून कारवाई करू या बाबी बद्दल निवेदन तक्रार प्राप्त झाले असून आम्ही पोलीस पथकाद्वारे वारंवार त्या भागात पाहणी करून स्थानिक पोलीस पथकाद्वारे कारवाई करून परिसरातील नागरिकांना दिलासा देऊ व महिलेच्या विरोधात कारवाई करू असे ठाणदार भूषण गावंडे यांनी सांगितले.