वाशिम नगरपरिषद समोर शिवसेनेच्या वतीने बेमुदत उपोषण.

 

 

नारायणराव आरू/प्रतिनिधी

 

वाशिम नगरपरिषद भ्रष्टाचाराने नगरपरिषद अंतर्गत १०४ कोटी रुपयांची का रुपयाच्या कामाची उद्घाटने दिनांक ७/५/२०१६ रोजी उद्घाटन झाले होते. त्यावेळी जी आश्वासने दिली होती, ती सुद्धा आजपर्यंत पूर्ण झालेली नाही.म्हणुणच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकांना उपोषणास बसावे लागले. यामध्ये २४ तास पाणीपुरवठा योजनेचे ५५कोटी, भूमिगत गटार योजनेचे १३ कोटी, अद्यावत नाट्यगृहाचे १० कोटी, नागरी दलित वस्तीचे १८ कोटी, अ‌ॅडव्हेंजर पार्क, प्लेनेटोरियम (तारांगण), टेम्पल गार्डन, अ‌ॅम्फी थिएटर, शहरातील सर्व रस्ते इत्यादी कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून शहरातील अनेक रस्ते थातूर- मातूर पद्धतीने पूर्ण करण्यात आले.

 

 

 

यामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे लक्षात येतेच. या कामामध्ये झालेल्या त्यावेळच्या भ्रष्टाचारी अधिकारी व लोकप्रतिनिधीवर कार्यवाही करावी या मागणीसाठी शिवसेनेचे राजाभैया पवार शहर समन्वयक व गजानन ठेंगडे युवासेना जिल्हा सचीव हे दिनांक १४ आ‌ॅगष्ट पासून वाशिम नगर परिषदेसमोर उपोषणास बसले आहेत. आजचा दुसरा दिवस अद्याप पर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने उपोषण करण्याची भेट घेऊन या चौकशीबाबत दूजोरा दिला नाही.