वाशिम: रिसोड येथील भारतीय स्टेट बँकेत केवायसी साठी महिलांना पाय ठेवायला जागा नाही, त्यातच घरचे झाले थोडे व्याह्याचे आले घोडे.

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील 

 

रिसोड येथील पोद्दार शाळेच्या के जी -वन के जी- टू व पहिलीच्या विद्यार्थ्यांना बँक व्हिजिट साठी आणले गेले. म्हणजे ज्या मुलांना व्यवस्थित बोलताही येत नाही अशा विद्यार्थ्यांना शाळेचे प्रशासन बँकिंग काय शिकवणार ? तर बँकेचे प्रशासन महिलांच्या व व्यावसायिकांच्या गर्दीत आपली कामे बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना बँकिंगचे धडे कसे सांगणार? “नेमकी ही बुद्धी शाळा प्रशासन व बँक प्रशासन यांना सूचली कुठे” !

 

 

 

स्टेट बँकेच्या अनागोंदी कारभारा बद्दल अनेक प्रश्न पुढे येत असतात. त्यातच आज या विद्यार्थ्यांनी जवळपास मनी ट्राॅन्सफर माहिती साठी बँकेच्या गेटवर ताटकळत ग्राहकांना व विद्यार्थ्यांना राहावे लागले त्यानंतर या विद्यार्थ्यांनी काय बँकिंग शिकली आणि बँक प्रशासनाने नेमके बँकेचे कुठले धडे या विद्यार्थ्यांना दिले नेमकं या भेटीतून काय साध्य केलं हे ते शाळा आणि बँकेच जाणे.मात्र केवळ दोघांच्याही प्रसिद्धीसाठी केलेल्या या कृतीबद्दल शाळा व बँक प्रशासनाला जबाबदार आहे याबाबत खुलासा मागणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे रिसोड तालुका अध्यक्ष गोपाल खडसे यांनी दिली.