वाशिम : रविकांत तुपकर समर्थक संतप्त शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीचे कार्यालय फोडले.

 

 

 

वाशीम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील 

 

सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहत असून सामान्यांच्या विविध प्रश्नावर सरकार भर देत आहे मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न हे तसेच राहत असल्याचे चित्र महाराष्ट्रामध्ये डोळ्यासमोर येत आहे. मागील वर्षी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे हे अवकाळी पावसाने नुकसान झाले. त्यामुळे पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिक विमा देणे अपेक्षित होते मात्र शेतकऱ्यांना पिक विमा न मिळाल्याने संतप्त झालेल्या रविकांत तुपकर यांच्या कार्यकर्त्यांनी यायची कंपनीचे कारंजा येथील कार्यालयाची नासधूस केली. जर हे पैसे मिळाले नाही तर मुंबईचे विमा कार्यालय फोडू असा इशारा रविकांत तूपकर (ravikant tupkar) समर्थक बालाजी मोरे यांनी दिला.

 

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील २०२३ चा ७०५८० भरला होतो .

तक्रारी २५१७५ होत्या .

रक्कम मिळाली ६८७२ .

वंचित १७९७९ राहिलेले.