रविकांत तुपकरांची विजयगोपाल (जि.वर्धा) येथे झाली निर्धार सभा.देवळी तालुक्यात सभेला शेतकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद.

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील

 

रविकांत तुपकरांची देवळी तालुक्यातील विजयगोपाल (जि.वर्धा) येथे काल (ता.०६ ऑक्टोबर २०२४) झालेल्या निर्धार सभेला शेतकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलतांना रविकांतभाऊ तुपकर म्हणाले की, या भागात पुन्हा एकदा शेतकरी चळवळ जोर धरते आहे. माझे सहकारी श्री.किरण ठाकरे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मोठं संघटन उभं होत आहे, ही अतिशय आंनददायी बाब आहे. शेतकऱ्यांनीही आता आपल्या प्रश्नावर पेटून उठण्याची आवश्यकता आहे.

 

 

सोयाबीन-कापसाला भाव नाही, शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे, पण याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही, मतांच्या राजकारणात सर्व व्यस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आता प्रश्नावर जागरूक होत या नेत्यांना जाब विचारला पाहिजे, जो नेता आपल्याकडे मतं मागायला येईल त्याला सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसाठी काय केलं हे हातात रूम्हणं घेवून विचारा, असे आवाहन यावेळी रविकांतभाऊ तुपकरांनी शेतकऱ्यांना केले.