Pune accident latest news : पुणे येथील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरच्या कारने चौघांना उडवले. पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वल्लभनगर बसस्थानकासमोर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. डॉ. पीयूष प्रशांत टोणपे (२२, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. टोणपे पुणे येथील ‘ससून रुग्णालयात’ इंटर्नशिप करीत आहेत.
ते सोमवारी दुपारी पुणे येथून त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी वल्लभनगर बसस्थानकासमोर त्यांचा कारवरील ताबा सुटला. यात कारने धडक दिल्याने चौघे जखमी झाले. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका रिक्षालाही कारने धडक दिली. ही रिक्षा टपरीला धडकली.टपरीमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या अंगावर गरम तेल उडाल्यानेतीदेखील जखमी झाली. या अपघातात तिघे किरकोळ तर एक गंभीर जखमी झाला. कारचा टायर फुटल्याने डॉ. टोणपे यांचा कारवरील ताबा सुटल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
अपघातानंतर कारचालक डॉ. पीयूष टोणपे dr. piyush topne त्यांच्या वाहनातून जखमींना रुग्णालयात घेऊन गेले. त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.