
Sambhaji nagar latest news : छत्रपती संभाजीनगर, ‘अंतरवाली सराटी’ येथील मनोज जरांगे-पाठील यांच्या आंदोलनाविरोधात महिनाभरापूर्वी जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणारे अंतरवाली सराटी येथील रहिवासी डॉ. रमेश तारख पाटील यांच्या तोंडाला झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी काळे फासले. “तुमचा सत्कार करायचा आहे, असे म्हणत. तोंडाला शाई फासली. या घटनेवर मनोज जरांगे-पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया नोंदविली नाही. डॉ. तारख है जरांगे-पाटील यांचे सहकारी राहिलेले आहेत. त्यांनी महिनाभरापूर्वी निवेदन दिले होते..
झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा आधी सत्कार केला आणि त्यानंतर काळे फासले. मनोज जरांगे-पाटील manoj jarange patil यांनी अंतरवली सराटी येथे केलेल्या उपोषणाला डॉक्टर तारख यांनी विरोध केला होता. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी उपोषणाविरोधात अर्ज केला होता. तारख हे नेहमी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध करत असल्याची भूमिका घेतात. त्याच्या निषेधार्थ झुंजार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं आहे.
झुंजार संघटनेचे कार्यकर्ते आधी डॉक्टर तारख यांच्या कार्यालयात त्यांना भेटायला गेले त्यानंतर त्यांचा सत्कार केला, त्यानंतर त्यांच्या तोंडाला काळे फासले. भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांपैकी एका त्यांचे हात धरुन ठेवले त्यानंतर एकाने त्यांच्या तोंडाला काळे फासले.
छत्रपती संभाजीनगरमधील कार्यकर्ते होते, ते सेहल कोटकर यांचे मित्रमंडळी होते. त्यांनी सकाळी मला फोन करत पेशंट दाखवण्यासाठी आणणायचं असल्याचं सांगितलं. त्यांना आपण दुपार तीन वाजेपर्यंत येण्यासाठी सांगितले. त्यानंतर ते आले, बाहेर सुरक्षा रक्षकासोबतही त्यांनी अरेरावी केली. कार्यालयात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की, ते म्हणाले, आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. तुमचा वाढदिवस आहे, फेसबुकवर तुमचा वाढदिवस असल्याचं म्हणत त्यांनी सत्कार करण्याचा बहाणा केला,असं डॉक्टर तारख म्हणाले.
पण माझा वाढदिवस नसल्याने मला त्यांचा संशय आला. कार्यालयात आलेल्या लोकांपैकी एकाने खांद्यावर शाल टाकली, दोन जणांनी दरवाजा लावला. एकाने हात धरून ठेवले त्यानंतर एकाने माझ्या चेहऱ्यावर काळे फासले. मनोज जरांगे पाटील यांचा विरोध का केला. त्यांच्याविरोधात निवेदन का दिलं, अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ केली, अशी माहिती तारख यांनी दिलीय.